Gram_Panchayat_Election.jpeg | बेळगाव : आरक्षण सोडत स्थळांची यादी जाहीर; ग्रामपंचायत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : आरक्षण सोडत स्थळांची यादी जाहीर; ग्रामपंचायत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद

belgavkar.com | belgaum | belgavkar

आरक्षण जाहीर करण्याबाबतचे वेळापत्रक जाहीर

बेळगाव : ग्रामपंचायत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठीचे आरक्षण जाहीर करण्याबाबतचे वेळापत्रक जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यानुसार 16 ते 24 जानेवारी या काळात तालुकानिहाय आरक्षणाच्या सोडती काढण्यात येणार आहेत. बेळगाव व खानापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदांचे आरक्षण 21 जानेवारी रोजी जाहीर केले जाणार आहे. ग्रामपंचायतीसाठी निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठीची यादी जिल्हा पंचायतीत तयार केली जात आहे. यादी अंतिम टप्प्यात आली आहे.
अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात येणार आहे. यासाठी त्या त्या तालुक्यातील सोडतसाठी स्थळांची निश्चिती करण्यात आली आहे. तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली ही सोडत काढण्यात येणार आहे.
आरक्षण जाहीर करण्याचे वेळापत्रक
तालुका तारीख वेळ ठिकाण
अथणी 16 सकाळी 10 ते 1 मुरचंद्र शिवयोगी स्वामी सभाभवन
कागवाड 16 दुपारी 3 ते 5.30 मल्लिकार्जून कन्वेंशन हाँल
रायबाग 18 सकाळी 10 ते 1 महावीर भवन
मुडलगी 18 दुपारी 3 ते 5.30 सोनवलकर कल्याण मंटप
हुक्केरी 19 सकाळी 10 ते 1 विश्वराज कल्याण मंटप
कित्तूर 19 दुपारी 3 ते 5.30 वीरभद्रेश्वर कल्याण मंटप
बेळगाव 21 सकाळी 10 ते 1 महात्मा गांधी भवन
खानापूर 21 दुपारी 3 ते 5.30 पाटील गार्डन
गोकाक 22 सकाळी 10 ते 1 बसवेश्वर कल्याण मंटप
बैलहोंगल 22 दुपारी 3 ते 5.30 शिवबसव कल्याण मंटप
चिकोडी 23 सकाळी 10 ते 1 नागलिंगेश्वर कल्याण मंटप
निपाणी 23 दुपारी 3 ते 5.30 आशिर्वाद भवन
रामदुर्ग 24 सकाळी 10 ते 1 सांस्कृतिक भवन
सौंदत्ती 24 दुपारी 3 ते 5.30 मामणी कल्याण सभाभवन
बेळगाव तालुक्यासाठी 30 ग्रामपंचायतीत खुल्या वर्गातील अध्यक्ष असणार आहेत. ग्रामपंचायत अध्यक्ष - उपाध्यक्षपदासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशावरून राज्य सरकारने अधिसूचना जारी केली. निवडणूक विभागाने राज्यभरातील ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या वर्गवारी जाहीर केल्या आहे. अध्यक्ष - उपाध्यक्षपदाचा कार्यकाळ प्रत्येकी 30 महिन्यांचा राहणार आहे.

पंचायतींवर महिलाराज : ग्रामपंचायत निवडणुकीत महिलांसाठी 50 टक्के आरक्षण आहे. आता अध्यक्ष, उपाध्यक्षपदातही महिलांसाठी 50 टक्के आरक्षण असणार आहे. त्यामुळे पंचायतींवर महिलाराज पाहायला मिळणार आहे.
5,956 ग्रामपंचायतींसाठी आरक्षणाची घोषणा करून अध्यक्ष - उपाध्यक्ष निवडीचा मार्ग सोयीस्कर बनविण्यात आला आहे. अनुसूचित जाती आणि जमातीसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात समान वाटप करण्याची सूचना देण्यात आली. मागासवर्गासाठी एक तृतीयांश पदे आरक्षित करण्यात येतील. एससी, एसटी आणि ओबीसीसाठी एकूण पदांची संख्या पंचायतीतील एकूण पदांच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाही, यांचे बंधन घालण्यात आले आहे. ग्रामपंचायतींत सदस्यांची संख्या समान राहिल्यास अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड लॉटरीद्वारे पंचायतीच्या सदस्यांच्या उपस्थितीत केली जावी, अशी सूचना करण्यात आली आहे.