अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी CEO पार्थो दासगुप्ता यांच्यातील कथित लीक चॅट व्हायरल

अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी CEO पार्थो दासगुप्ता यांच्यातील कथित लीक चॅट व्हायरल

belgavkar.com | belgaum | belgavkar

'ते' WhatsApp चॅटिंग लोकशाहीला घातक;

अर्णब गोस्वामी प्रकरणावरुन रोहित पवारांची भाजपवर टीका

रिपब्लिकन वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि 'बार्क'चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील संवाद उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी याच मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाला (भाजप) खरमरीत सवाल केला आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत भाजपला यासंदर्भात प्रश्न विचारला आहे. अर्णब गोस्वामी यांच्यात आणि बार्क म्हणजेच ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलचे माजी अधिकारी, माजी CEO पार्थो दासगुप्ता यांच्यातील काही WhatsApp चॅट लीक झाले आहेत असं बोललं जातंय. कथित लीक झालेले हे whats app चॅट सामाजिक माध्यमांवर व्हायरल देखील झालेत.
दरम्यान, प्रशांत भूषण यांनी अर्णब गोस्वामी आणि पार्थो दासगुप्ता यांच्यातील संभाषणाचे कथित WhatsApp चॅट्स ट्विटरवरून प्रसिद्ध केले आहेत.

या प्रकरणावरून आता काँग्रेसने भाजपवर निशाणा साधलाय. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या प्रकरणावरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. TRP घोटाळ्यात भाजप आणि केंद्र सरकारचा हात असल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केलाय. त्यामुळे यावर भारतीय जनता पक्षाने आता यावर स्पष्टीकरण द्यावे असं सचिन सावंत म्हणालेत.
कथित पत्रकाराला भाजपच्या वरपासून तळापर्यंतच्या नेत्यांचा पाठिंबा असल्याचं त्यांच्या चॅटिंगवरुन दिसतंय. भाजपच्या प्रसिद्धीसाठीच त्यांना ताकद दिली जात होती का? एखाद्या निर्णयापूर्वीच अशा प्रकारे माहिती लिक होत असेल तर देशविरोधी शक्तीही याचा फायदा उठवू शकतात. हे लोकशाहीला घातक आहे, असे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
या चॅटमुळे अर्णब आणि टीआरपी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेले दासगुप्ता यांचे लागेबांधे होते हे स्पष्ट होत असून अर्णबचा पाय मात्र खोलात जात असल्याचे बोलले जात आहे. तर टीआरपी घोटाळाप्रकरणासाठी हे चॅट महत्वाचे आहे असे पोलिसांनी म्हटले आहे.
पार्थ हे टीआरपी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहेत. त्यांचे अर्णबबरोबरचे हे महत्वाचे चॅट असून त्याचा स्क्रिनशॉट शुक्रवारी व्हायरल झाला आहे. हा 500 पानांचा दस्तऐवज आहे. या चॅटमध्ये दासगुप्ता बार्कची गोपनीय माहिती सोशल मिडियाच्या माध्यमातून अर्णब यांना देत. तसेच अर्णब याचे पंतप्रधान कार्यालयाबरोबरच केंद्र सरकारच्या सदस्यांबरोबर जवळकीचे संबंध असल्याचे या चॅटमध्ये दिसत आहे. अर्णब टिआरपी मिळवण्यासाठी भाजप सरकारची मदत घ्यायचे असे यात दिसत आहे. या चॅटमध्ये बड्या राजकीय नेत्यांच्या नावाचाही उल्लेख आहे.
अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअँप संवाद व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र याची जोरदार चर्चा सुरू आहे. या दोघांमधील संवादात मंत्र्यांबद्दलही आक्षेपार्ह विधाने करण्यात आली आहेत. यासह बालाकोट एअर स्ट्राइकबाबतही या दोघांमध्ये संवाद झाल्याचे उघडकीस आले आहे. अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्या संवादात केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांचा उल्लेख निष्क्रिय असा करण्यात आला आहे. समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या संभाषणात सर्व मंत्री आपल्याबरोबर आहेत, अशा शब्दांत गोस्वामी यांनी पार्थ यांना दिलासा दिल्याचे समोर आले आहे. अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यातील संवाद समोर आल्यानंतर सोशल मीडियावर टीकेचा भडीमार करण्यात आला. हाच विषय ट्रेडिंगवरही होता, अशी माहिती मिळाली आहे.
These are a few snapshots of the damning leaked WhatsApp chats between BARC CEO & #ArnabGoswami. They show many conspiracies&unprecedented access to power in this govt; gross abuse of his media&his position as power broker. In any Rule of law country, he would be in jail for long
pic.twitter.com/6aGOR6BRQJ

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी CEO पार्थो दासगुप्ता यांच्यातील कथित लीक चॅट व्हायरल
'ते' WhatsApp चॅटिंग लोकशाहीला घातक;

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm