बेळगाव : तिसऱ्या रेल्वे गेटजवळ रेल्वेखाली सापडून अनोळखीचा मृत्यू

बेळगाव : तिसऱ्या रेल्वे गेटजवळ रेल्वेखाली सापडून अनोळखीचा मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : टिळकवाडी येथील तिसऱ्या रेल्वे गेटजवळ रेल्वेखाली सापडून अनोळखीचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी(15 जानेवारी) ही घटना घडली असून बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. रेल्वे पोलिसांनी सुमारे 40 वर्षीय अनोळखी युवकाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. 5.6 फूट उंची, काळसर वर्ण, अंगाने सुदृढ असे त्याचे वर्णन आहे.
त्याने आपल्या अंगावर निळ्या रंगाचा फुल टि - शर्ट व राखाडी नाईट पॅन्ट परिधान केली आहे. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सध्या त्या अनोळखीचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात ठेवण्यात आला आहे. ओळख पटविण्यासाठी संबंधितांनी 0831 2405273 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : तिसऱ्या रेल्वे गेटजवळ रेल्वेखाली सापडून अनोळखीचा मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm