बेळगाव : टोल चुकवला; पण जीवाला मुकला...

बेळगाव : टोल चुकवला;
पण जीवाला मुकला...

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : भरधाव जाणाऱ्या ट्रकचालकाचे वळण येताच नियंत्रण सुटल्याने ट्रकाची झाडास जोराची धडक बसून झालेल्या अपघातात ट्रकचालक जागीच ठार झाल्याची घटना आडी फाट्यानजीकच्या ओढ्यात शनिवारी रात्री 11 च्या सुमारास घडली. दिलीप नेताजी बनसोडे (वय 29, रा. सावंतपूर वसाहत, पलूस जि. सांगली) असे मृत टकचालकाचे नाव आहे. तर या अपघातात राकेश वसंत बल्लाळ (रा. तांबवे, जि. सांगली) हा किरकोळ जखमी झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दिलीप हा ट्रक (MH 50 4599) ने बांबवडे (जि. कोल्हापूर) येथून 20 टन भात घेऊन हुबळीला जात होता. यावेळी कागल व कोगनोळी येथील टोल तसेच आरटीओ चुकवून तो कागल एमआयडीसीवरून मांगूर, कुन्नूर, आडीमार्गे जात होता. शनिवारी रात्री 11 च्या सुमारास आडी फाट्यानजीकच्या ओढ्यात आल्यानंतर वळणावर अचानक दिलीप याचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्यानजीकच्या झाडावर आदळला.
यानंतर टक रस्त्यानजीकच्या शेतात पलटी झाला. यात भाताची पोतीही शेतात सर्वत्र विखुरली होती. हा अपघात इतका भीषण होता की दिलीप याचा मृतदेह ट्रकमध्ये अडकला होता. यानंतर क्रेनद्वारे ट्रक व मृतदेह काढण्यात आला. निपाणी ग्रामीण पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : टोल चुकवला; पण जीवाला मुकला...

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm