बेळगाव : नाईंगलज (ता. चिकोडी) येथील विवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. श्रुती मल्लिकार्जुन खोत (वय 23) असे तिचे नाव आहे. घटनेची नोंद खडकलाट पोलिसांत झाली आहे. श्रुती या शनिवारी सायंकाळी घरापासून जवळच असलेल्या विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या.
घागर भरण्यासाठी त्या विहिरीत उतरताना त्यांचा पाय घसरल्याने त्या बुडल्या. रात्रीची वेळ असल्याने रविवारी सकाळी चिकोडी येथील अग्निशामक विभागाच्या मदतीने विहिरीत बुडालेला श्रुती यांचा बाहेर काढला.