गुजरातच्या सुरतपासून 60 किमी अंतरावर कोसांबा गावात भीषण अपघात झाला. एका ट्रकने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजूरांना चिरडले आहे. या घटनेमुळे नजीकच्या गावात भीतीचे वातावरण पसरले होते. धक्कादायक जीवितहानी अशी : या अपघातात एकूण 15 जणांचा मृत्यू झाला असून यात 14 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एका लहान मुलीचाही रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तर इतर गंभीर जखमी आहेत. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
ऊसाची वाहतूक करणारा ट्रक अतिशय वेगात पुढे जात असल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे, गाडी नियंत्रणात न आल्याने रस्त्याच्या कडेला जाऊन तो ट्रक झोपलेल्या मजूरांच्या अंगावर गेला. या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेले लोक मजूरीचं काम करत असून सर्वच जण राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील कुशलगडचे रहिवाशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
- बेळगाव शहरात जारकीहोळींच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा; आमचे साहेब... VIDEO; न विसरणारा मोर्चा..
- ती चौघांसोबत पळाली पण कुणाशी गाठ बांधावी? गावानं चिठ्ठ्या टाकल्या, पुढे जे झालं त्याची देशभरात चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर शोक केला व्यक्त - सुरतमध्ये ट्रकच्या अपघातामुळे जीवितहानी झाल्याची घटना दुःखदायक आहे. माझे विचार शोकग्रस्त कुटुंबांसमवेत आहेत. सूरत येथे झालेल्या अपघातामुळे बळी पडलेल्यांपैकी प्रत्येकाला पुढील पीएमएनआरएफकडून 2 लाख रु. (पीएमएनआरएफ कडून) देण्यात येईल आणि जखमींना 50,000 रु. देण्यात येतील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.