netaji-subhash-chandra-bose.jpeg | नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी होणार, केंद्राचा मोठा निर्णय | belgaum news | belgavkar बेळगावकर

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी होणार, केंद्राचा मोठा निर्णय

belgavkar.com | belgaum | belgavkar

केंद्र सरकारनं थोर स्वातंत्र्यसेनानी आणि आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhash Chandra Bose) यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ (Parakram Diwas) म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती यावर्षीपासून ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 ला झाला होता.
केंद्र सरकारकडून आज (19 जानेवारी) दुपारी 3 वाजता नॅशनल मीडिया सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेत अधिक माहिती दिली जाणार आहे. पराक्रम दिवस साजरा करण्याबाबत केंद्र सरकारकडून सूचना आणि कार्यपद्धती जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार जयंतीच्या कार्यक्रमाचा शुभारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाांचा शुभारंभ 23 जानेवारीला कोलकाता येथील ऐतिहासिक ‘विक्टोरिया मेमोरियल हॉल’ येथून करतील.
कोरोना महामारी सुरु झाल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदा कोलकात्याच्या दौऱ्यावर असतील. नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची पुतणी चित्रा घोष यांच्या निधनावर आदरांजली अर्पण केली होती. नरेंद्र मोदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं शौर्य सर्वांना माहिती आहे, असं ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले होते.
सुभाषचंद्र बोस यांचे 125 वे जयंती वर्ष : केंद्र सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या वर्षानिमित्त कार्यक्रमांच्या आयोजनासाठी उच्चस्तरिय समिती स्थापन केली होती. गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती.
यामध्ये इतिहास अभ्यासक आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या परिवारातील सदस्य आणि आझाद हिंद सेनेतील काही सदस्यांचा समावेश करण्यात आला होता. 23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंती सप्ताहाची सुरुवात केली जाणार आहे. नवी दिल्ली, कोलकाता आणि आझाद हिंद सेनेशी संबंधित ठिकाणी जंयतीच्या कार्यक्रमांचं आयोजन केले जाणार आहे.