naming-ceremony-cemetery-historic-event-in-smashan-nipani-hunnaragi-belgaum-202101.jpg | बेळगाव : स्मशानभूमीत बाळाचे बारसे ही ऐतिहासिक घटना | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : स्मशानभूमीत बाळाचे बारसे ही ऐतिहासिक घटना

belgavkar.com | belgaum | belgavkar

हुन्नरगीत स्मशानात नामकरण सोहळा

बेळगाव ता. निपाणी : हुन्नरगी येथील काँग्रेस कार्यकर्ते बाळू बरगाले यांच्या नातवाचा नामकरण सोहळा स्मशानभूमीत पार पडला आहे. स्मशानभूमीत नामकरण सोहळा झालेल्या बालकाचे नाव ‘भीमराव’ असे ठेवण्यात आले. बालकाचे वडील हे शिक्षक असून आई ग्रा.प. सदस्या आहेत. कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व मानव बंधुत्व वेदिकेचे संस्थापक सतीश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमातून अंधश्रद्धा निर्मूलना संदेश दिला गेला. मंदिर आणि दफनभूमी ही सर्व पवित्र स्थाने आहेत पण काही लोक घाबरत आहेत.
समाजातील जाती भेद, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बसवेश्वर या महापुरुषांनी लढाई केली आहे. आताच्या काळात स्मशानभूमीत बाळाचा नामकरण सोहळा करणे ही क्रांतिकारक बाब आहे, असे मत सतीश जारकीहोळी यांनी केले. जारकीहोळी पुढे म्हणाले की, हुन्नरगीसारख्या छोट्या गावात स्मशानभूमीत नामकरण सोहळा होणे हा ऐतिहासिक क्षण आहे. या उपक्रमाने बरगाले यांनी आदर्श निर्माण केला आहे.
यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी खासदार प्रकाश हुक्केरी, माजी आमदार काकासाहेब पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, प्रा. सुभाष जोशी, आमदार गणेश हुक्केरी, विलास गाडीवड्डर, उत्तम पाटील (बोरगाव), अशोककुमार असोदे, राजेंद्र वड्डर, महावीर मोहिते, सुजाता मगदूम, दादा पाटील, सुनील चौगुले, राजू मुल्ला, किरण रजपूत यांची उपस्थिती होती. यावेळी हुन्नरगीमधील नूतन सदस्यांचा सत्कार जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन चंद्रशेखर हिरेमठ यांनी केले, तर आभार राहुल गुरव यांनी मानले.