राजपथावर यंदा भक्ती-शक्तीचा जागर, छत्रपती शिवाजी महाराज आणि संत परंपरेचा फिरता देखावा अंतिम टप्प्यात

राजपथावर यंदा भक्ती-शक्तीचा जागर, छत्रपती शिवाजी महाराज आणि संत परंपरेचा फिरता देखावा अंतिम टप्प्यात

belgavkar.com | belgaum | belgavkar

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी यंदा राजपथावर अवघ्या जगाला भारताच्या लष्करी सामर्थ्यासह महाराष्ट्राची संत परंपरा पाहायला मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम यांच्या भेटीच्या फिरत्या देखाव्याचा समावेश यंदाच्या चित्ररथात असणार आहे. त्याचबरोबर तुकारामांची गाथा आणि संत साहित्याची महती या देखाव्याद्वारे सांगितली जाणार आहे. काही वारकरीही या चित्ररथावर पाहायला मिळतील.
प्रजासत्ताक दिनाला अवघे काही 6 दिवस बाकी आहेत. त्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत गोरोबा काका, संत जनाबाई यांचा देखावा अंतिम टप्प्यात आला आहे.
कसा असेल यंदाचा चित्ररथ? यंदा राजपथावर छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचा फिरता देखावा साकारला जाणार आहे. या चित्ररथात तुकारामांची गाथा, संत साहित्याची महती पाहायला मिळणार आहे. अनेक वारकरीही या चित्ररथावर दिसणार आहेत. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत गोरोबा काका, संत जनाबाई यांचा देखावा यंदाच्या चित्ररथावर साकारला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
राजपथावरील महाराष्ट्राच्या चित्ररथांची परंपरा
प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथांची नेहमीच छाप पडली आहे. सुरुवातीची अनेक वर्षे महाराष्ट्राचा चित्ररथ प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात सहभागी झाला नव्हता. मात्र, नंतर महाराष्ट्राचा संचलनातील सहभाग लक्षणीय ठरला होता. 1980 मध्ये शिवराज्याभिषेक या महाराष्ट्राच्या चित्ररथाने पहिला क्रमांक मिळवला होता. त्यानंतर 1983 मध्ये बैलपोळ्याचा चित्ररथ अव्वल आला होता. 1993, 1994 आणि 1995 अशी सलग 3 वर्षे महाराष्ट्राच्या चित्ररथांनी राजपथावरील संचलनात बाजी मारली होती. त्यानंतर 2015 मध्ये पंढरीची वारी या महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला होता. तर 2018 मध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या चित्ररथाने बाजी मारली होती.
2020 मध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला स्थान नाही
मागील वर्षी राजपथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सामील झाला नव्हता. 2020 च्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनासाठी महाराष्ट्राने पाठवलेला प्रस्ताव नाकारण्यात आला होता. गेल्यावर्षीच्या संचलनासाठी मराठी रंगभूमीचती 175 वर्षे या थीमवर चित्ररथ साकारण्याचा प्रस्ताव केंद्राला दिला होता. पण तो नाकारण्यात आला. गेल्या वर्षी महाराष्ट्रासह पश्चिम बंगालच्या चित्ररथाचाही प्रस्ताव नाकारला होता.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

राजपथावर यंदा भक्ती-शक्तीचा जागर, छत्रपती शिवाजी महाराज आणि संत परंपरेचा फिरता देखावा अंतिम टप्प्यात

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm