leopard-spotted-khanapur-taluka-villages-golihalli-forest-range-20210120.jpg | बेळगाव : खानापूरच्या या तीन गावांमध्ये बिबट्याचा वावर; शोधमोहीम हाती घेतली | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : खानापूरच्या या तीन गावांमध्ये बिबट्याचा वावर; शोधमोहीम हाती घेतली

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. खानापूर : गोलिहळ्ळी वनक्षेत्रातील करतन बागेवाडी व बिळकी गावाजवळील शिवारात मंगळवारी (19 जानेवारी) सकाळी शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याची दखल घेऊन वन खात्याने तातडीने शोधमोहीम हाती घेतली. मात्र, बिबट्याचा माग काही लागला नाही. मात्र, शोधमोहीम बुधवारीही सुरु ठेवणार असल्याचे वनक्षेत्रपाल श्रीनाथ कडोलकर यांनी सांगितले. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी दिवसभर परिसरात शोधमोहीम राबविली. पण बिबट्याच्या कुठेच खाणाखुणा आढळून आल्या नाहीत.
पारिश्वाड रस्त्यावरील बिळकी, आवारोळी आणि करतन बागेवाडी शिवारातही दोन शेतकऱ्यांना दर्शन घडले. याबाबत तातडीने वनविभागाला माहिती देण्यात आली. गोलिहळ्ळी वनक्षेत्रपाल श्रीनाथ कडोलकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवाराकडे धाव घेऊन बिबट्याच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या प्राण्यांच्या खानाखुणा सापडतात का त्याची पाहणी केली. जलस्रोतांच्या ठिकाणीही बिबट्याच्या पाऊल खुणा शोधण्यात आल्या. बिबट्या बिळकीजवळील तलावात पाणी पिण्यासाठी येत असावा. त्यामुळे या परिसरातील लोकांनी जंगलात जाताना जागृत राहण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.
पारिश्वाड रस्त्यावरील वरील तिन्ही गावांच्या कार्यक्षेत्रात बिबट्याचा वावर असल्याची माहिती ग्रामस्थांनी वन खात्याला दिली. त्यानुसार वनक्षेत्रपाल कडोलकर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दिवसभर शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, बिबट्या सापडला नाही. त्यामुळे, वनाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना भीती न बाळगण्याचे आवाहन केले आहे. ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी शक्यतो घराबाहेर पडू नये. तसेच बिबट्याबद्दल माहिती मिळाल्यास अथवा तो दिसल्यास तातडीने वन खात्याला कळविण्यास सांगितले आहे.