बेळगाव महापालिका वार्ड क्रमांक 1 ते 5; प्रभागाचे क्षेत्र आणि आरक्षण

बेळगाव महापालिका वार्ड क्रमांक 1 ते 5;
प्रभागाचे क्षेत्र आणि आरक्षण

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव महापालिकचे तात्कालिक प्रभाग आरक्षण जाहीर

बेळगाव : महापालिका प्रभाग (वार्ड Ward) पुनर्रचनेची कर्नाटक राज्य सरकारने अखेर अधिसूचना जारी केली आहे. राज्य शासनाकडून बेळगाव महापालिकेच्या 58 प्रभागांचे तात्कालीक आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. 2018 सालच्या प्रभाग पुनर्रचनेनुसारच हे प्रभार आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता महापालिका निवडणूक होणार हे नक्की झाले आहे.
प्रभाग (Ward) 1 | राखीवता : इतर मागास अ महिला
उत्तर : शनिवार खूट सीटीएस 3557 पासून खंजर गल्ली मागील बाजू ग्रीन ताज हॉटेल, सीटीएस 3610 खंजर शहा दर्गा क्रॉसपर्यंत. खंजर गल्ली, उर्दू शाळा, दरबार गल्ली क्रॉस, सीटीएस 3668, बागवान गल्ली, सीटीएस 3720, कोतवाल गल्ली, डबल रस्ता, काकर गल्ली, जुना पीबी रोड ते सीटीएस 4710 पर्यंत.
पूर्व : जुना पीबी रोड काकर गल्ली क्रॉसपासून खडेबाजार सीटीएस 3008/1 ब पर्यंत. खडेबाजार, टेंगिनकेरा गल्ली, मोतीलाल चौक, मेणसे गल्ली सीटीएस 806/अ पर्यंत.
दक्षिण : सीटीएस 2078, हिरा टॉकिजपर्यंत. जोशी बाजार रस्ता सीटीएस 2125, गणपत गल्ली क्रॉस सीटीएस 1991 पर्यंत.
पश्चिम : गणपत गल्ली क्रॉस ते शनिवार खूट सीटीएस 3557 पर्यंत
प्रभाग 2 | राखीवता : सामान्य
उत्तर : काकतीवेस चांदू गल्लीपासून घी गल्ली, जालगार गल्ली, कोतवाल गल्ली (डबल रस्त्याजवळ), सीटीएस 3978/1 अ पर्यंत.
पूर्व : बागवान गल्ली, सीटीएस 3719, दरबार गल्ली सीटीएस 3666, खंजर गल्ली सीटीएस 3642, खंजर गल्ली क्रॉस सीटीएस 3601 पर्यंत.
दक्षिण : खंजर गल्ली भंगी रस्त्यापासून खडेबाजार हॉटेल ग्रीन ताजपर्यंत. खंजर गल्ली ते शनिवार खूट सीटीएस 3865 पर्यंत.
पश्चिम : शनिवार खूट सीटीएस 3865 पासून चांदू गल्ली, काकतीवेस क्रॉसची विहिर ते पूर्ण काकतीवेस रोडपर्यंत.


प्रभाग 3 | राखीवता : इतर मागास वर्ग ब महिला
उत्तर : जोशी बाजार 806/अ पासून मेणसे गल्ली सीटीएस 3237 व्हाया टेंगिनकेर गल्ली, आझाद गल्ली, बीपी क्रॉस, महापालिका दवाखान्यापर्यंत. सीटीएस 2798 ते टेंगिनकेर गल्ली सीटीएस 2593 आणि 3592, खडेबाजार रस्ता क्रॉस (शीतल हॉटेल) ते जुना पीबी रोड पै हॉटेल पर्यंत.
पूर्व : पै हॉटेल ते एम. एन. देसाई सॉ मीलपर्यंत.
दक्षिण : एम. एन. देसाई सॉ मीलपासून जुन्या पीबी रोडवरील खताल दर्गा मार्ग रिकामी जागेपर्यंत. सीटीएस 2635, 2637 पर्यंत.
पश्चिम : सीटीएस 2635 पासून जुना पीबी रोड ते टेंगिनकेर गल्लीपर्यंत. आझाद गल्ली ते शहर रूग्णालयापर्यंत.
प्रभाग 4 | राखीवता : सामान्य
) उत्तर : डॉ. बी. ई. कुलकर्णी सीटीएस 3437 पासून गोंधळी गल्ली, नार्वेकर गल्ली, सीटीएस 3525 खडेबाजार पोलिस ठाण्यापर्यंत. रिसालदार गल्ली, सीटीएस 3576/अ शनिवारखूट पर्यंत. जोशी बाजार रोड ते हिरा थिएटरपर्यंत.
पूर्व : हिरा थिएटर मागील बाजू, रविवार पेठ मुख्य रस्ता, सीटीएस 7171, कर्नाटक चौक, कलमठ रोड क्रॉस, नरगुंदकर भावे चौकपासून शनिमंदिर आणि अनंतशयन गल्ली क्रॉसपर्यंत.
दक्षिण : अनंतशयन गल्ली मुख्य रस्त्यापासून कोनवाळ गल्ली सीटीएस 1218, टिळक चौक राघवेंद्र मंदिरापासून कोनवाळ गल्ली नाल्यापासून रामलिंगखिंड गल्ली, गंगाप्रभा हॉटेल धर्मवीर संभाजी चौकापर्यंत.
पश्चिम : धर्मवीर संभाजी चौकापासून किर्लोस्कर रोड बाटा शोरूमपर्यंत. कालकुंद्रीकर इमारतीपासून रामदेव गल्ली सीटीएस 1705 पर्यंत. सिद्धरामेश्वर कॉम्प्लेक्स, आदर्श ड्रेस सर्कल, खडेबाजार यश प्लाझा, समादेवी मंदिर रोड, कार्पोरेशन बैंक, गोंधळी गल्ली, डॉ. बी. जी. कुलकर्णी यांच्या रूग्णालयापर्यंत.
प्रभाग 5 | राखीवता : सामान्य महिला
उत्तर : सरदार्स हायस्कूलपासून काकतीवेस रोड, कोर्ट कंपाऊंड, टोपी गल्ली, दरबार गल्ली क्रॉसपर्यंत. शेट्टी गल्ली, कोतवाल गल्ली, चव्हाट गल्ली, जुन्या पीबी रोडपर्यंत.
पूर्व : शेट्टी गल्ली पासून पीबी रोड क्रॉस, चव्हाट गल्ली, काकर गल्ली, कोतवाल गल्ली क्रॉसपर्यंत.
दक्षिण : काकर गल्ली सीटीएस 4719 पासून कोतवाल गल्ली, डबल रोड, सीटीएस 3778/1 अ, दरबार गल्ली क्रॉस, जालगार गल्ली, घी गल्ली क्रॉस, वाहतूक पोलिस ठाणे, कचेरी गल्ली क्रॉस, चांदू गल्ली, तहसील कार्यालय, काकती वेसपर्यंत.
पश्चिम : काकतीवेस रोड, चांदू गल्ली क्रॉस, सरदार्स हायस्कूल रोडपर्यंत.
पण, पुनर्रचनेत सुसूत्रता नाही. वार्ड क्र. 1 माळी गल्लीपासून सुरु होतो. तर वडगाव शेवटच्या प्रभागात आहे. 2018 साली करण्यात आलेलीच पुनर्रचना काही प्रमाणात फेरफार करून कायम ठेवण्यात आली असल्याचे दिसून येते. आतापर्यंत 1 ते 26 प्रभाग बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघात आणि 27 ते 58 प्रभाग बेळगाव उत्तर मतदारसंघात येत होते. पण, आता जाहीर झालेल्या प्रभाग पुनर्रचनेत अशी सलगता दिसून येत नाही. त्यामुळे लोकांचा गोंधळ उडणार आहे. प्रभाग पुनर्रचना करताना ती किचकट झाली असल्यामुळे त्याचा परिणाम प्रत्यक्ष मतदानावरही होण्याची शक्यता अधिक आहे. मतदार यादीत घोळ होण्याची भीती व्यक्त होत आहे.
बेळगावातील 58 प्रभागांचे आरक्षण खालीलप्रमाणे
प्रभाग क्रमांक आरक्षण
1 इतर मागास अ महिला
2 सामान्य
3 इतर मागास ब महिला
4 सामान्य
5 सामान्य महिला
6 इतर मागास अ
7 इतर मागास ब
8 सामान्य
9 इतर मागास अ महिला
10 इतर मागास ब महिला
11 सामान्य
12 इतर मागास अ
13 सामान्य महिला
14 इतर मागास ब
15 इतर मागास अ महिला
16 सामान्य
17 अनुसूचीत जाती महिला
18 सामान्य
19 इतर मागास अ
20 सामान्य महिला
21 इतर मागास अ महिला
22 सामान्य
23 सामान्य
24 इतर मागास अ
25 सामान्य महिला
26 इतर मागास अ महिला
27 सामान्य
28 अनुसूचित जाती
29 सामान्य
30 इतर मागास अ
31 इतर मागास अ महिला
32 अनूसूचित जाती
33 सामान्य महिला
34 सामान्य
35 अनुसूचित जाती महिला
36 सामान्य
37 सामान्य महिला
38 इतर मागास अ
39 सामान्य
40 इतर मागास अ महिला
41 सामान्य
42 इतर मागास अ
43 सामान्य महिला
44 सामान्य
45 अनुसूचित जमाती महिला
6 सामान्य
47 सामान्य महिला
48 इतर मागास अ
49 सामान्य महिला
50 सामान्य महिला
51 अनुसूचित जाती
52 सामान्य महिला
53 अनुसूचित जमाती
54 सामान्य महिला
55 सामान्य महिला
56 सामान्य महिला
57 सामान्य महिला
58 सामान्य महिला

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव महापालिका वार्ड क्रमांक 1 ते 5; प्रभागाचे क्षेत्र आणि आरक्षण
बेळगाव महापालिकचे तात्कालिक प्रभाग आरक्षण जाहीर

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm