belgaum-khasbag-bio-medical-waste-processing-plant-seized-belgaum-city-corporation-202101.jpg | बेळगाव शहरातील वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प डोकेदुखी बनल्याने टाळेच ठोकले; | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव शहरातील वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प डोकेदुखी बनल्याने टाळेच ठोकले;

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : खासबाग कचरा डेपो येथे असलेल्या वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे कामकाज नियमानुसार होत नसल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. वारंवार सूचना करूनही काहीच बदल झाला नसल्याने अखेर महापालिका प्रशासनाने वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्पाला टाळे ठोकले आहेत. शहरातील खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम खासबाग येथील प्रकल्पात करण्यात येते. वैद्यकीय आस्थापनांकडून तयार होणारा वैद्यकीय कचरा ही नवीन डोकेदुखी बनली आहे.
मात्र, शहर आणि ग्रामीण भागातील रुग्णालयांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाणही वाढले आहे. वैद्यकीय आस्थापनात तयार होणाऱ्या वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रियाची सोय आणि या कचऱ्याचे करावे काय हा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा राहिला होता. प्रक्रिया प्रकल्पाच्या क्षमतेपेक्षा अधिक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया व्यवस्थित होत नसल्याची तक्रार वाढली आहे. चिमणीमधून निघणारी भुकटी परिसरात उडत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
वैद्यकीय कचरा प्रकल्पाबाबत तक्रारी वाढल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळानेदेखील बजावली होती. यामुळे महापालिका प्रशासनाने वैद्यकीय प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी करून विविध सूचना केल्या होत्या. कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित लावण्याची सूचना केली होती. पण याची दखल घेण्यात आली नसल्याने सदर प्रकल्पाला टाळे ठोकण्याची कारवाई मंगळवारी करण्यात आली. यावेळी महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ, साहाय्यक पर्यावरण अभियंते आदिलखान पठाण आदींसह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.