angol-girl-missing-belgaum-market-police-station-swati-kammar-202101.jpg | बेळगाव शहरातील तरुणी बेपत्ता | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव शहरातील तरुणी बेपत्ता

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : नाथ पै नगर, अनगोळ येथून तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार येथील मार्केट पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली आहे. स्वाती सदानंद कम्मार (वय 19, रा. नाथ पै नगर, अनगोळ) असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे. पांगुळ गल्ली येथे कपड्याच्या दुकानात स्वाती कामाला होती. नेहमीप्रमाणे ती कामावर जाऊन येते असे सांगून 4 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता घरातून निघून गेली.
त्यानंतर 4 जानेवारी रोजी रात्री 9 वा. दुकान मालकाकडून वेतन घेऊन उद्यापासून कामाला येणार नसल्याचे सांगून बाहेर पडली होती. त्यानंतर ती घरीही परतलेली नाही किंवा नातेवाईक, पाहुण्यांच्या घरीही पोचलेली नाही. घरच्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. पण ती मिळून आली नाही, अशी तक्रार तिचा भाऊ आनंद कम्मार याने मार्केट पोलिस स्थानकात दाखल केली आहे.
तिची उंची 5 फूट, रंग गोरा, गोल चेहरा, अंगाने सुदृढ असून ती मराठी, कन्नड, हिंदी बोलते. घरातून जाताना तिने अंगावर पिवळ्या रंगाचा स्कर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली होती. याबाबत माहिती मिळाल्यास मार्केट पोलिस स्थानकाशी (0831-2405242) संपर्क साधाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.