lake-talab-lake-talav.jpeg | बेळगाव : हंदिगनूर गावात बेळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठ्या तलावाची निर्मिती; त्यांच्यावर कारवाईची मागणी | belgaum news | belgavkar बेळगावकर
प्रतिकात्मक फोटो

बेळगाव : हंदिगनूर गावात बेळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठ्या तलावाची निर्मिती; त्यांच्यावर कारवाईची मागणी

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : हंदिगनूर (ता. बेळगाव) गावातील सर्व्हे क्र. 24 मधील 21 एकर जागेत बेळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठ्या तलावाची निर्मिती होणार आहे. या तलावाचा भूमिपूजन कार्यक्रम गुरुवारी (21 जानेवारी) सकाळी 11 वाजता हस्ते होणार आहे. आमदार सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते भूमिपूजन होईल. हंदिगनूर येथे तलाव बांधण्यास ग्रामपंचायत सदस्यांचा विरोध होत असल्याची तक्रार हंदिगनूर येथील ग्रामीण कुली कामगार संघटनेचे अध्यक्ष जोतिबा मनवाडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मनवाडकर यांनी निवेदनात म्हटले आहे, की हंदिगरनुरातील कुली कामगारांनी एकत्र येऊन गावासाठी तलाव खोदाईला गेल्या वर्षी मंजुरी मिळवून घेतली आहे.
कोरोनाच्या संकटामुळे तलाव पायाखोदाईला विलंब झाल्याने खोदाईचे काम हाती घेण्यात आले होते. भूमिपूजन व खोदाईचे साहित्य घेऊन कुली कामगार संघटनेचे सदस्य तेथे दाखल झाल्यानंतर ग्राम पंचायत सदस्यांनी विरोध केला आहे. गावात विकासकामे करण्याची जबाबदारी आमची आहे, असे सांगत विरोध केला. तलावाचे काम आणखी रखडत राहू नये, या उद्देशाने कुली कामगार संघटनेचे काम चालविले आहे. हंदिगनूर गावच्या विकासासाठी जिल्हा पंचायतच्या माध्यमातून उद्योग खात्री योजनेंतर्गत 21 एकरमध्ये तलाव निर्मिती करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
मात्र, ग्रामपंचायतमध्ये बैठक घेऊन माझी बदनामी करून जनतेची दिशाभूल करत आहेत. तरी संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जोतिबा मनवाडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तलावाची निर्मिती झाली तर गावचा विकास व शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. या तलावासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा करून जिल्हा पंचायतीकडे सर्व कागदपत्रे दिली आहेत. गावच्या विकासासाठी आम्ही ही धडपड करत आहोत. मात्र, आमचीच बदनामी काही जणांनी सुरू केली आहे. ग्रामपंचायत निवडणूक झाली तरी सभागृह अस्तित्वात आले नाही. असे असताना ग्रामपंचायत सदस्यांनी बैठक घेऊन माझ्या विरोधात खोटे आरोप केल्याचे निवेदनात म्हटले आहे. तरी या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी व न्याय द्यावा, अशी मागणी मनवाडकर यांनी निवेदनात केली आहे.