belgaum-mla-abhay-patil-karnataka-minister-cabinet-expansion-202101.jpg | कर्नाटक : अखेर खातेवाटप जाहीर, पाहा कोणाला कोणतं खातं?  मंत्रिमंडळ विस्तार | belgaum news | belgavkar बेळगावकर

कर्नाटक : अखेर खातेवाटप जाहीर, पाहा कोणाला कोणतं खातं? मंत्रिमंडळ विस्तार

belgavkar.com | belgaum | belgavkar

'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती

कर्नाटक : गुरुवारी (21 जानेवारी) कर्नाटकातील नव्या मंत्र्यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्या मंत्रिमंडळाचा हा तिसऱ्यांदा विस्तार झाला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर येडीयुरप्पांनी मंत्र्यांची नावे निश्चित केली होती.
Minister name Ministers allotted portfolios
Aravind Limbavali अरविंद लिंबावली Forest Department | वन विभाग
N Nagaraj एन नागराज Excise Department | उत्पादन शुल्क विभाग
Umesh Katti उमेश कत्ती (आमदार हुक्केरी, बेळगाव) Food, Civil Supplies and Consumer Affairs Department | अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
R Shankar आर शंकर Municipal Administration Department | मनपा प्रशासन विभाग
C P Yogeshwara सीपी योगेश्वरा Minor Irrigation Department | लघु पाटबंधारे विभाग
M Nirani एम निराणी Mines and Geology Department | खान आणि भूविज्ञान विभाग
S Angara एस अंगारा Fisheries and Ports and Inland Transport Department | मत्स्य व्यवसाय आणि बंदर आणि अंतर्देशीय परिवहन विभाग
belgaum-mla-abhay-patil-karnataka-minister-cabinet-expansion-20210121_ka_mlas.jpg | कर्नाटक : अखेर खातेवाटप जाहीर, पाहा कोणाला कोणतं खातं?  मंत्रिमंडळ विस्तार | belgaum news | belgavkar बेळगावकर
उमेश कत्ती, अरविंद लिंबावली, मुरुगेश निरानी, एस अंगारा, आर. शंकर, सी.पी. योगेश्वर आणि एमटीबी नागराज या आमदारांना मंत्रिपद देण्यात आले आहे. 2019 च्या जुलैमध्ये काँग्रेस-जेडीएसच्या 17 आमदारांनी बंडखोरी करत राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेस-जेडीएस सरकार कोसळल्यामुळे येडीयुरप्पा पुन्हा सत्तेत आले होते. यापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळात 27 मंत्री होते, त्यानंतर झालेल्या विस्तारानंतर आता एकूण मंत्र्यांची संख्या 34 वर गेली आहे. गेल्या वर्षभरापासून या विस्ताराबाबत चर्चा सुरू होत्या.