kolhapur-shivsainik-goes-belgaum-over-yellow-saffron-flag-mahapalika-belgaum-corporation-202101.jpg | महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवर तणाव, कोल्हापुरातील शिवसैनिकांचा मोर्चा सीमेवरील शिनोळी गावाजवळ येऊन धडकला | belgaum news | belgavkar बेळगावकर

महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवर तणाव, कोल्हापुरातील शिवसैनिकांचा मोर्चा सीमेवरील शिनोळी गावाजवळ येऊन धडकला

belgavkar.com | belgaum | belgavkar

कोल्हापूर शिवसेनेचे विजय देवणे आणि संजय पवार यांच्या बेळगाव जिल्हा प्रवेशबंदी

बेळगावमध्ये महानगरपालिकेच्या समोर भगवा झेंडा फडकावणारच असा निर्धार करून कोल्हापुरातील शिवसेनेचा मोर्चा महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर शिनोळी गावाजवळ येऊन धडकला आहे. मात्र, सीमेवर पोलिसांनी शिवसैनिकांना रोखले. यावेळी पोलिस आणि शिवसैनिकांमध्ये धक्काबुक्की झाली. पोलिसांचा बंदोबस्त झुगारून आम्ही जाणारच असा आंदोलकांनी पवित्र घेतला आहे. सीमेवर तणावाचे वातावरण असून पोलिसांनी अधिक कुमक मागवली आहे.
YouTube Video

28 डिसेंबर रोजी बेळगाव महापालिका कार्यालयासमोर काही कन्‍नडिगांनी बेकायदा लाल-पिवळा ध्वज फडकावला. त्यामुळे मराठी जनतेत संतापाची लाट उसळली. म. ए. समितीने जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची भेट घेऊन 21 जानेवारीच्या आत बेकायदा लाल-पिवळा ध्वज हटवावा; अन्यथा विराट मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा दिला होता. त्यानुसार शहरात आणि गावोगावी जनजागृती करण्यात आली. त्याला मोठा प्रतिसाद लाभला. त्यामुळे जिल्हा प्रशासन हबकून गेले होते.
महापालिकेसमोरील लाल-पिवळा ध्वज हटवण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी म. ए. समिती नेत्यांशी चर्चा करण्याची तयारी दर्शवल्यामुळे आणि पोलिस प्रशासनाने चर्चा होईपर्यंत मोर्चा काढू नये, असा दबाव आणल्यामुळे बुधवारी म. ए. समितीने लाल-पिवळ्या ध्वजाविरोधातील मोर्चा स्थगित केला. पण, बेकायदा ध्वज हटवण्याबाबत कायदेशीर निर्णय झाला नाही तर पुन्हा मोर्चाचे रणशिंग फुंकण्यात येईल, असा इशाराही दिला.
YouTube Video
कोल्हापूर शिवसेनेचे विजय देवणे आणि संजय पवार यांच्या बेळगाव प्रवेशावर पोलीस खात्याने बंदी घातली आहे. वरिष्ठ जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस आयुक्तांच्यावतीने हा आदेश जारी करण्यात आला आहे. बेळगावमधील शांतता बिघडण्याची शक्यता आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यामुळे खबरदारी म्हणून या नेत्यांना बेळगाव प्रवेश बंदी करण्यात आल्याचे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.