BGMCCB_1.jpg | बेळगाव महापालिका वार्ड क्रमांक 6 ते 10; प्रभागाचे क्षेत्र आणि आरक्षण | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव महापालिका वार्ड क्रमांक 6 ते 10; प्रभागाचे क्षेत्र आणि आरक्षण

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव महापालिकचे तात्कालिक प्रभाग आरक्षण जाहीर

बेळगाव : महापालिका प्रभाग (वार्ड Ward) पुनर्रचनेची कर्नाटक राज्य सरकारने अखेर अधिसूचना जारी केली आहे. राज्य शासनाकडून बेळगाव महापालिकेच्या 58 प्रभागांचे तात्कालीक आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. 2018 सालच्या प्रभाग पुनर्रचनेनुसारच हे प्रभार आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता महापालिका निवडणूक होणार हे नक्की झाले आहे.
प्रभाग 6 (Ward) | : राखीवता : इतर मागास वर्ग अ
उत्तर : कोनवाळ गल्ली सीटीएस 1203 पासून टिळक चौक, अनंतशयन गल्ली दक्षिण भाग, घर क्र. 1104 पासून घर क्र. 1148 पर्यंत. पंचवटी बिल्डर्सपासून शनिमंदिर रोड, नरगुंदकर भावे चौक, कलमठ रोड पायोनियर अर्बन बँक, रविवारपेठ सीटीएस 767/1 अपासून कलईगार गल्ली सीटीएस 975 पर्यंत. माळीगल्ली क्रॉस, उर्दू शाळा क्र. 2, मराठी शाळा क्र. 4, मोकाशी गल्ली, खतालवाल दर्गापर्यंत
पूर्व : खतालवाल दर्गा, जुना पीबी रोड, कलईगार गल्ली कॉर्नर, ट्रंक रोड पश्चिम भाग, फुलबाग गल्ली उत्तर भाग सीटीएस 4880/47 ए एस. जी. हसबे यांच्या घरापर्यंत.
दक्षिण : फुलबाग गल्ली उत्तर भाग, पाटील गल्ली, सर्व्हे क्र. 853/1, घर क्र 588, शनिमंदिर पर्यंत. तांगडी गल्ली, जैन मंदिर सर्व्हे क्र. 276, घर क्र.1171 पर्यंत. पश्चिम : घर क्रमांक 1172 ते कोनवाळ गल्ली नाला, महापालिका विभागीय कार्यालय, सर्व्हे क्र. 1203 पर्यंत

प्रभाग 7 | : राखीवता : इतर मागास ब वर्ग
उत्तर : कॉलेज रोड अतुल पुरोहित स्वीट मार्टपासून सरदार्स हायस्कूल रोड, काकतीवेस गल्ली.
पूर्व : काकतीवेस रोड सीटीएस 3964 पासून शनिवार खूट, रिसालदार गल्ली क्रॉसपर्यंत.
दक्षिण : रिसालदार गल्ली ते खडेबाजार पोलीस ठाण्यापर्यंत. नार्वेकर गल्ली सीटीएस 3515, गोंधळी गल्ली, सीटीएस 3346 ते दत्त कॉम्प्लेक्सपर्यंत. समादेवी गल्ली, रामदेव गल्ली, सुभाष फोटो स्टुडिओपर्यंत, किर्लोस्कर रोड सीटीएस 1737, केळकर बाग ते आयडीबीआय बँक पर्यंत.
पश्चिम : समादेवी गल्ली, कॉलेज रोड सीटीएस 3441 ते अतुल पुरोहित स्वीट मार्टपर्यंत.
प्रभाग 8 | राखीवता : सामान्य
उत्तर : चन्नम्मा चौकापासून रायण्णा चौक ते आरटीओ चौकापर्यंत.
पूर्व : रायण्णा चौकापासून जुना पीबी रोड, कीर्ती हॉटेल जवळ, चव्हाट गल्ली, शेट्टी गल्ली भंगी बोळापर्यंत.
दक्षिण : शेट्टी गल्ली, चव्हाट गल्ली क्रॉस, कोतवाल गल्ली, दरबार गल्ली, टोपी गल्ली भंगी पॅसेजपर्यंत. कोर्ट कंपाऊंड, काकतीवेस क्रॉस, सरदार्स हायस्कूल मैदान क्रॉसपासून कंग्राळ गल्ली भंगी पॅसेजपर्यंत.

प्रभाग 9 | राखीवता : इतर मागास अवर्ग महिला
उत्तर : मॅजिस्टिक हॉटेलपासून सर्व्हे 244/139, फुलबाग गल्ली दक्षिण भाग, उषाताई गोगटे इमारत पाटील गल्ली, बी. एन. पाटील यांचे घर क्र. 403 पर्यंत.
पूर्व : जुने पीबी रोडपासून रेल्वे ट्रक, सीटीएस 904/10, सी. एल. जाधव यांच्या घरापासून जिजामाता चौकापर्यंत. ए. आर. ताशिलदार यांच्या घरापासून फोर्ट रोड मॅजिस्टिक हॉटेलपर्यंत.
दक्षिण : घर क्र 70 पासून भांदूरगल्ली, घर क्र. 65, फुलबाग गल्लीपासून सीटीएस 904/ 10 पर्यंत.
पश्चिम : बी. एन. पाटील यांच्या घरापासून पाटील गल्ली कॉर्नर, कपिलेश्वर रोड, जे. एन. पाटील यांचे घर क्र. 434, एम. के. जुवेकर यांचे घर, रेल्वे ट्रॅकपर्यंत.
प्रभाग 10 | राखीवता : इतर मागास ब वर्ग महिला
उत्तर : दोड्डण्णावर घर क्र. 43/5 पासून रेल्वे ट्रॅक जवळील बी. जी. मुनीरमठ घर क्र. 71/अ पर्यंत. कपिलेश्वर कॉलनी पूर्व भाग, एम. जी. जुवेकर घर क्र. 179 पासून के. डी. पाटील घर क्र. 434/अ पर्यंत. तांगडी गल्ली भंगी पॅसेजपासून घर क्र. 369/अ 1 पर्यंत. डी. एन. सुंठकर यांच्या घरापासून राजमहल बारपर्यंत.
पूर्व : तानाजी गल्ली रेल्वे ट्रॅकपासून दोड्डण्णावर यांच्या घरापर्यंत. महाव्दार रोड, साळुखे यांचे घर, महाव्दार रोड दुसरा क्रॉस बुडा लेआऊटपर्यंत.
दक्षिण : पाटील मळा क्रॉस क्र. 2, व्ही. एम. गोडचिनवर यांचे घर, पवार यांचे घर, रेल्वे गेटचा दक्षिण भाग, स्वच्छता गृह आणि नाल्याचा पूर्व भाग, कपिलेश्वर रोड, सर्व्हे क्र. 9/2 पर्यंत.
पश्चिम दिशा : शिवाजी रोडपासून सीटीएस 1171/6 अ 1, पुर्विका लॉज, मिनाक्षी भवनपासून पाटील मळा क्रॉसपर्यंत. नाल्याचा पूर्व भाग, व्ही. एम. भोजण्णावर यांच्या घरापर्यंत.
बेळगावातील 58 प्रभागांचे आरक्षण खालीलप्रमाणे
प्रभाग क्रमांक आरक्षण
1 इतर मागास अ महिला
2 सामान्य
3 इतर मागास ब महिला
4 सामान्य
5 सामान्य महिला
6 इतर मागास अ
7 इतर मागास ब
8 सामान्य
9 इतर मागास अ महिला
10 इतर मागास ब महिला
11 सामान्य
12 इतर मागास अ
13 सामान्य महिला
14 इतर मागास ब
15 इतर मागास अ महिला
16 सामान्य
17 अनुसूचीत जाती महिला
18 सामान्य
19 इतर मागास अ
20 सामान्य महिला
21 इतर मागास अ महिला
22 सामान्य
23 सामान्य
24 इतर मागास अ
25 सामान्य महिला
26 इतर मागास अ महिला
27 सामान्य
28 अनुसूचित जाती
29 सामान्य
30 इतर मागास अ
31 इतर मागास अ महिला
32 अनूसूचित जाती
33 सामान्य महिला
34 सामान्य
35 अनुसूचित जाती महिला
36 सामान्य
37 सामान्य महिला
38 इतर मागास अ
39 सामान्य
40 इतर मागास अ महिला
41 सामान्य
42 इतर मागास अ
43 सामान्य महिला
44 सामान्य
45 अनुसूचित जमाती महिला
6 सामान्य
47 सामान्य महिला
48 इतर मागास अ
49 सामान्य महिला
50 सामान्य महिला
51 अनुसूचित जाती
52 सामान्य महिला
53 अनुसूचित जमाती
54 सामान्य महिला
55 सामान्य महिला
56 सामान्य महिला
57 सामान्य महिला
58 सामान्य महिला
पण, पुनर्रचनेत सुसूत्रता नाही. वार्ड क्र. 1 माळी गल्लीपासून सुरु होतो. तर वडगाव शेवटच्या प्रभागात आहे. 2018 साली करण्यात आलेलीच पुनर्रचना काही प्रमाणात फेरफार करून कायम ठेवण्यात आली असल्याचे दिसून येते. आतापर्यंत 1 ते 26 प्रभाग बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघात आणि 27 ते 58 प्रभाग बेळगाव उत्तर मतदारसंघात येत होते. पण, आता जाहीर झालेल्या प्रभाग पुनर्रचनेत अशी सलगता दिसून येत नाही. त्यामुळे लोकांचा गोंधळ उडणार आहे. प्रभाग पुनर्रचना करताना ती किचकट झाली असल्यामुळे त्याचा परिणाम प्रत्यक्ष मतदानावरही होण्याची शक्यता अधिक आहे. मतदार यादीत घोळ होण्याची भीती व्यक्त होत आहे.