belgaum-villages-Gram-Panchayats-in-Belgaum-panchayat-2021012-page-1-marathi.jpg | बेळगाव तालुका ग्राम पंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष आरक्षण; गावनिहाय आरक्षण सोडत जाहीर | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव तालुका ग्राम पंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष आरक्षण; गावनिहाय आरक्षण सोडत जाहीर

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव तालुक्यातील ग्राम पंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष आरक्षण (गावनिहाय आरक्षण) जाहीर झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंचपदाची आरक्षण सोडत झाली आहे. सरपंचपदाची सोडत खालील प्रमाण आहे. ग्रामपंचायतीसाठी निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठीची यादी तयार झाली आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात येणार आहे.
belgaum-villages-Gram-Panchayats-in-Belgaum-panchayat-2021012-page-1-marathi-bgm.jpg | बेळगाव तालुका ग्राम पंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष आरक्षण; गावनिहाय आरक्षण सोडत जाहीर | belgaum news | belgavkar बेळगावकर
ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष
उचगाव ग्रामपंचायत अ वर्ग सामान्य महिला
मारिहाळ अ वर्ग ब वर्ग
मच्छे अ वर्ग सामान्य महिला
काकती अ वर्ग सामान्य महिला
होनगा अ वर्ग सामान्य महिला
मुत्नाळ अ वर्ग अनुसूचित जाती
करडीगुद्दी अ वर्ग अनुसूचित जाती महिला
किणये अ वर्ग महिला सामान्य
मुचंडी अ वर्ग महिला सामान्य
पिरनवाडी अ वर्ग महिला अनुसूचित जाती
धामणे एस अ वर्ग महिला अनुसूचित जाती
बाळेकुंद्री के. एच. अ वर्ग महिला सामान्य महिला
तारिहाळ अ वर्ग महिला, उपाध्यक्ष सामान्य महिला
आंबेवाडी ब वर्ग अनुसूचित जमाती महिला
सांबरा ब वर्ग महिला अ वर्ग महिला
बेनकनहळ्ळी ब वर्ग महिला अनुसूचित जमाती
येळ्ळूर सामान्य उपाध्यक्ष ब वर्ग महिला
मुतगा सामान्य उपाध्यक्ष अनुसूचित जमाती महिला
हंदिगनूर सामान्य सामान्य महिला
बम्बरगे सामान्य अ वर्ग महिला
अष्टे सामान्य उपाध्यक्ष सामान्य महिला
हिंडलगा सामान्य अनुसूचित जमाती महिला
हलगा सामान्य उपाध्यक्ष अ वर्ग महिला
सुळेभावी सामान्य अनुसूचित जाती महिला
तुम्मरगुद्दी सामान्य उपाध्यक्ष सामान्य
संतीबस्तवाड सामान्य सामान्य महिला
कंग्राळी खुर्द सामान्य सामान्य महिला
बीजगर्णी सामान्य, उपाध्यक्ष ब वर्ग महिला
बेळवट्टी सामान्य अनुसूचित जमाती महिला
धर्मट्टी सामान्य सामान्य
रेहाब सेंटर मार्कंडेय सामान्य अनुसूचित जाती महिला
कडोली सामान्य महिला अ वर्ग महिला
बागेवाडी सामान्य महिला अ वर्ग महिला
सुळगे (उ) सामान्य महिला सामान्य
अंकलगी सामान्य महिला सामान्य
न्यूवंटमुरी सामान्य महिला सामान्य
कंग्राळी बुद्रुक सामान्य महिला सामान्य
हुदली सामान्य महिला अ वर्ग
मास्तमर्डी सामान्य महिला अ वर्ग
तुरमुरी सामान्य महिला सामान्य
बाळेकुंद्री बुद्रुक सामान्य महिला अ वर्ग
मंडोळी सामान्य महिला अनुसूचित जमाती
बडस खुर्द सामान्य महिला अ वर्ग
निलजी सामान्य महिला अनुसूचित जमाती
नंदिहळ्ळी सामान्य महिला सामान्य
बेळगुंदी सामान्य महिला अ वर्ग
केदनूर अनुसूचित जाती सामान्य महिला
केकेकोप्प अनुसूचित जाती सामान्य महिला
अरळीकट्टी अनुसूचित जाती महिला अ वर्ग
बेक्किनकेरे अनुसूचित जाती महिला अ वर्ग
कुकडोळ्ळी अनुसूचित जाती महिला सामान्य
बस्तवाड अनुसूचित जाती सामान्य महिला
देसूर अनुसूचित जाती अ वर्ग महिला
मोदगा अनुसूचित जाती सामान्य महिला
कलखांब अनुसूचित जाती सामान्य महिला
कुद्रेमानी अनुसूचित जमाती महिला सामान्य
अगसगे अनुसूचित जमाती महिला सामान्य
भेंडीगिरी अनुसूचित जमाती महिला सामान्य
सुळगे (ये) अनुसूचित जमाती महिला सामान्य
निवडणूक विभागाने ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी वर्गवारी जाहीर केली आहे. त्यामध्ये बेळगाव तालुक्यासाठी 30 ग्रामपंचायतीत खुल्या वर्गातील अध्यक्ष असणार आहेत. ग्रामपंचायत अध्यक्ष - उपाध्यक्षपदासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशावरून राज्य सरकारने अधिसूचना जारी केली. निवडणूक विभागाने राज्यभरातील ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या वर्गवारी जाहीर केल्या आहे. अध्यक्ष - उपाध्यक्षपदाचा कार्यकाळ प्रत्येकी 30 महिन्यांचा राहणार आहे. 50 टक्के आरक्षण त्या त्या वर्गातील महिलांसाठी राखीव असणार आहे. बेळगाव तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींवर खुल्या गटातील अध्यक्ष, उपाध्यक्ष विराजमान होणार आहेत. अनुचित जाती वर्गासाठी 5 ग्रामपंचायती राखीव असणार आहेत. त्यामध्ये 3 ग्रामपंचायती महिला वर्गासाठी राखीव आहेत. अनुसूचित जमाती वर्गासाठी 8 ग्रामपंचायती राखीव असणार आहेत. इतर मागास अ वर्गासाठी 13 ग्रामपंचायती राखीव आहेत. इतर मागास ब वर्गासाठी 3 ग्रामपंचायती राखीव आहेत.
पंचायतींवर महिलाराज : ग्रामपंचायत निवडणुकीत महिलांसाठी 50 टक्के आरक्षण आहे. आता अध्यक्ष, उपाध्यक्षपदातही महिलांसाठी 50 टक्के आरक्षण असणार आहे. त्यामुळे पंचायतींवर महिलाराज पाहायला मिळणार आहे.
5,956 ग्रामपंचायतींसाठी आरक्षणाची घोषणा करून अध्यक्ष - उपाध्यक्ष निवडीचा मार्ग सोयीस्कर बनविण्यात आला आहे. अनुसूचित जाती आणि जमातीसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात समान वाटप करण्याची सूचना देण्यात आली. मागासवर्गासाठी एक तृतीयांश पदे आरक्षित करण्यात येतील. एससी, एसटी आणि ओबीसीसाठी एकूण पदांची संख्या पंचायतीतील एकूण पदांच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाही, यांचे बंधन घालण्यात आले आहे. ग्रामपंचायतींत सदस्यांची संख्या समान राहिल्यास अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड लॉटरीद्वारे पंचायतीच्या सदस्यांच्या उपस्थितीत केली जावी, अशी सूचना करण्यात आली होती.


अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड करताना ग्रामपंचायतींना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय (अ), मागासवर्गीय (ब), सामान्य (स्त्री) सामान्य या क्रमाने निश्चित करण्यात यावेत. एकाच ग्रामपंचायतीत एकाच कालावधीसाठी अध्यक्ष, उपाध्यक्षपद अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करता येणार नाही. तसेच, मागासवर्गीय (अ) आणि मागासवर्गीय (ब) साठी अध्यक्ष, उपाध्यक्षपदे एकाच वेळी देता येणार नाहीत. तालुकावार अध्यक्ष, उपाध्यक्षपदे निश्चित करताना प्रथम सर्व अध्यक्षपदे निश्चित करण्यात यावीत, त्यानंतर उपाध्यक्षपदे आरक्षित आरक्षित केल्यास आरक्षणात कोणत्याही गटावर अन्याय होण्याचे रोखता येईल, असे या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.