Serum Institute सीरम इन्स्टिट्यूटमधील आगीत 5 कामगारांचा मृत्यू

Serum Institute सीरम इन्स्टिट्यूटमधील आगीत 5 कामगारांचा मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

Pune Serum Building Fire सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या इमारतीमध्ये लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
वेल्डिंग स्पार्कमुळे ही आग लागली आणि वाढली. आता आग विझवण्यात आली आहे, असंही त्यांनी सांगितलं.
पुणे : सीरमच्या BCG लस बनवण्याच्या इमारतीला दुपारी दोन वाजेच्या सुमारास आग लागलेली आहे. ज्या ठिकाणी बीसीजी लस बनवली जाते त्या ठिकाणी आग लागली. सीरम इन्स्टिट्यूटचा हा मांजरी भागातील नवीन प्लांट आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. बिल्डिंगचं काम सुरू होतं. वेल्डिंग स्पार्कमुळे ही आग लागली आणि वाढली. आता आग विझवण्यात आली आहे.
आगीत मृत्युमुखी पडलेले कामगार. प्रतिक पाष्टे - डेक्कन , पुणे महेंद्र इंगळे - नर्हे ,पुणे रमा शंकर हरिजन - यु.पी बिपीन सरोज - यु. पी. सुशिल कुमार पांडे - बिहार
ते म्हणाले, 6 व्या मजल्यावर जळालेल्या अवस्थेत हे मृतदेह आढळले. मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

माहितीप्रमाणे MSEZ 3 म्हणजे मांजरीमधील जो कारखाना आहे, त्यामध्ये MSEZ 3 या इमारतीला आग लागली. त्या ठिकाणी रोटा व्हायरस प्लांट इन्स्टॉलेशनचे काम चालू होते. तिथे वेल्डिंगचं काम सुरू होतं. आग आटोक्यात यायला 2 ते 3 तास वेळ लागला. आता आग आटोक्यात आली आहे. या आगीत पाच जणांचे मृतदेह आढळले आहेत, असं राजेश टोपे म्हणाले. राजेश टोपेंनी सांगितलं की, कोरोना लस निर्मिती जिथं होते ती इमारत घटनास्थळापासून दूर आहे. त्यामुळं लसीला कुठलंही नुकसान नाही. यासंदर्भात पोलिस तपास सुरु आहे, असं टोपेंनी सांगितलं.
काय म्हणाले होते अदर पुनावाला : सीरमचे सर्वेसर्वा अदर पुनावाला यांनी ट्वीट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, घटना कळल्यानंतर अनेकांनी चिंता व्यक्त केली आणि प्रार्थना केली, त्या सर्वांचे आभार.
मुख्यमंत्री काय म्हणाले... सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या इमारतीमध्ये आग लागण्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना तातडीने आग नियंत्रणात आणण्याच्या सूचना दिल्या. राज्याच्या यंत्रणेला देखील निर्देश दिले असून आता परिस्थिती नियंत्रणात आहे. आग संपूर्णपणे विझवण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
कोरोना प्रतिबंधक लसनिर्मितीचा प्रकल्प सुरक्षित - उपमुख्यमंत्री अजित पवार : उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट इमारतीला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु सुरू आहेत. शहर आणि जिल्हा प्रशासनाच्या सर्व संबंधित यंत्रणा आग विझविण्याचा आणि मदत कार्यात सहभागी आहेत. पुणे आयुक्तांकडून मी यासंदर्भातली माहिती घेतली असून दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत. सदर प्रकल्पाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात देशातून आणि देशाबाहेरही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात मी स्पष्ट करू इच्छितो की, कोरोना प्रतिबंधक लसनिर्मितीचा प्रकल्प सुरक्षित असल्याचे मला सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत आग विझवणे आणि दुर्घटनेमुळे होणारी हानी नियंत्रित ठेवणे यास सध्या प्राधान्य देण्यात येत आहे,असं अजित पवार यांनी सांगितलं.
आगीचा कोणताही परिणाम कोव्हिशिल्डवर नाही : कोविशिल्ड' लसीचे उत्पादन सुरू असलेली इमारत सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. कारण आग ही BCG लस बनवण्याच्या इमारतीला लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असून आग विझवली. ज्या ठिकाणी आग लागली तिथं कोरोना व्हॅक्सीन बनत नाही तर बीसीजीसाठीची लस बनते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

Serum Institute सीरम इन्स्टिट्यूटमधील आगीत 5 कामगारांचा मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm