janwad-village-chikodi-doctor-death-doctor-tanaji-kale-202101.jpg | बेळगावच्या डॉक्टरांचे दुःखद निधन | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगावच्या डॉक्टरांचे दुःखद निधन

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : जनवाड गावचे (ता. चिकोडी) सुपुत्र केएलई बेळगाव येथील प्रसिद्ध ह्रदय रोग तज्ञ, गोरगरीब सर्वसामान्यांचे डॉक्टर तानाजी आनंदा काळे यांचे आज (21 जानेवारी 2021) आकस्मिक निधन झाले. मोठा मित्रपरिवार असलेल्या तानाजी काळे यांच्या आकस्मिक निधनाने जनवाड सह परिसरात शोककळा पसरली आहे. मनमिळाऊ व गोरगरिबांचे, गोरगरिबांना सतत मदत करणारे तानाजी काळे यांच्या अवघ्या 35 वयाच्या वर्षी निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर सुद्धा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, बहिण, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. ते केएएस अधिकारी यल्लेश काळे यांचे बंधू होते. शुक्रवारी (22 जानेवारी) सकाळी 8 वाजता रक्षाविसर्जन आहे. माजी मुख्याध्यापक आनंद काळे यांचे ते पुत्र होते.
सदलगा प्रतिनिधी प्रतिक कदम