belgaum-ksrp-commandant-felicited-belgaum-dr-ravi-patil-202101.jpg | बेळगाव : राष्ट्रपती पदक पटकावलेल्या कमांडंटचे अभिनंदन; | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : राष्ट्रपती पदक पटकावलेल्या कमांडंटचे अभिनंदन;

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : कर्नाटक राज्यासाठी दिलेल्या अतुलनीय सेवेबाबत राष्ट्रपती पदक पटकावलेल्या केएसआरपी (कर्नाटक राखीव पोलिस दल) कमांडंट हमजा हुसेन यांचे विजया ऑर्थो अॅण्ड ट्रॉमा सेंटरचे (व्हीओटीसी VOTC) डॉ. रवी पाटील यांनी अभिनंदन केले. कमांडंट हुसेन यांनी आपल्या सेवा काळात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. त्याची दखल घेत सरकारने त्यांना राष्ट्रपती पुरस्कारासह सेवेतील सुवर्ण पदक बहाल केले आहे.
त्यामुळे व्हीओटीसीचे संचालक डॉ. रवी पाटील यांनी विशेष अभिनंदन केले. निष्ठावंत अधिकाऱ्यांना सरकारकडून दाद मिळाली आहे. यापुढेही समाजाच्या हितासाठी अशीच सेवा घडत राहो, अशा सदिच्छा त्यांनी दिल्या. यावेळी जनसंपर्कप्रमुख वीरेश हिरेमठ यांच्यासह बसवराज रोट्टी, केंपन्ना कोचरगी व इतर मान्यवर उपस्थित होते. कमांडंट हुसेन यांनी सत्काराबाबत कृतज्ञता व्यक्त केली.