kittur-rani-channamma-chouk-red-yellow-flag-missing-case-police-congratulations-202101.jpg | बेळगाव :  चौकातील लाल-पिवळा गायब घटनेचा योग्यरित्या तपास; पोलिसांचा विशेष सत्कार | Video | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : चौकातील लाल-पिवळा गायब घटनेचा योग्यरित्या तपास; पोलिसांचा विशेष सत्कार | Video

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : तणाव निर्माण होऊ पाहणाऱ्या घटनेचा योग्यरित्या तपास लावल्या प्रकरणी खडेबाजार पोलिस ठाण्याचे निरीक्षक व त्यांच्या दोघा सहकाऱ्यांचा डीसीपी डॉ. विक्रम आमटे यांनी विशेष प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. काही दिवसांपूर्वी कित्तूर राणी चन्नम्मा सर्कलमधील लाल - पिवळा ध्वज 26 डिसेंबर राञी 10.30 च्या दरम्यान अचानक गायब झाला. तो कोणीतरी काढल्याचा कांगावा करत कन्नड संघटनांनी याचा बाऊ केला. परंतु, हा ध्वज उसाने भरलेल्या ट्रकला अडकून तो गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून निरीक्षक धीरज शिंदे, त्यांचे सहकारी डी.जी. हट्टीकर व बसवराज नाकुडी यांनी दाखवून दिले.
CCTV VIDEO - YouTube

राणी चन्नम्मा चौकातील लाल पिवळा ध्वज गायब झाल्यानंतर कन्नड संघटनांनी तो मराठी भाषकांनीच काढल्याची अफवा पसरवीत भाषिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण, सत्य परिस्थिती समाजासमोर आणत कन्नड आणि मराठी भाषकांतील वादाला पूर्णविराम देण्याचे काम करणाऱ्या खडेबाजार पोलिस स्थानकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पोलिस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी सत्कार केला. कन्नड संघटनांनी महापालिकेसमोर लाल पिवळा ध्वज उभारला आहे. त्याला मराठी भाषकांचा तीव्र विरोध आहे.
अनधिकृत लालपिवळा ध्वज लावलेल्या दुसऱ्या दिवशीच चन्नम्मा चौकातील चन्नम्मा पुतळ्यासमोरील लालपिवळा ध्वज गायब झाला होता. मात्र, वस्तुस्थिती जाणून न घेताच कन्नड संघटनांनी ध्वज काढण्याचे खापर मराठी भाषकांवर फोडले. तशी अफवा पसरविण्यात आली. मराठी भाषिकांविरोधात गरळ ओकणारे आणि शहराची शांतता भंग करणारे व्हिडीओही व्हायरल केले. पण, खडेबाजार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरुन ध्वज कुणी काढला याचा छडा लावला होता. प्रत्यक्षात चौकातील ध्वज हा उसवाहू ट्रकमुळे तुटून त्यासोबतच गेल्याचे दिसून आले. पोलिसांनी सत्यस्थिती समाजासमोर आणल्याने कन्नड संघटनांचीही गोची झाली. संघटनांना मूग गिळून गप्प बसावे लागले. या तपासामुळे बेळगावातील शांतता राखण्यास मदत झाली होती. खडेबाजार पोलिसांच्या या कर्तव्यदक्षतेबाबत त्यांचा उपायुक्त डॉ. आमटे यांनी सत्कार केला. पोलीस निरीक्षक धीरज शिंदे यांच्यासह हेड कॉन्स्टेबल बसवंत नौकाडी, डी. एच. हट्टीकर यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.