nh4-tavandi-ghat-nipani-belgaum-glass-vehicle-202101.jpg | बेळगाव : NH4 वर अपघातामुळे काचांचा खच | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : NH4 वर अपघातामुळे काचांचा खच

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. निपाणी : पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्ग-4 वर तामिळनाडू येथून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या काच वाहतूक करणारा ट्रक दुभाजकाला धडकून उलटला. हा अपघात तवंदी घाटात झाला होता. यामध्ये चालक माणिक वासगम (वय 23) व क्लिनर एम भूमीनाताया (वय 24, रा.तामिळनाडू ) हे दोघे गंभीर जखमी झाले.
या अपघातामुळे मुख्य रस्त्यावर काचांचा खच पडून राहिल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घाटातील धोकादायक दुसऱ्या वळणावर आला. चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक रस्त्यातच उलटला. अपघातानंतर रस्त्यावरील काचा त्यानंतर हटविण्यात आल्या आहेत.