बेळगाव : बांधकामावर पाणी मारत असताना विजेचा धक्का बसून मृत्यू

बेळगाव : बांधकामावर पाणी मारत असताना विजेचा धक्का बसून मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. निपाणी : विद्युत मोटारीद्वारे बांधकामावर पाणी मारत असताना विजेचा धक्का बसून एकाचा मृत्यू झाला. शिवापूरवाडी (ता. निपाणी) येथे गुरुवारी (4 मार्च) सकाळी 8.30 सुमारास ही घटना घडली. दादासाहेब मल्लाप्पा डांगे (वय 61) असे मृताचे नाव आहे. त्याबाबत निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दादासाहेब डांगे यांच्याघराचे शिवापूरवाडीत बांधकाम सुरू आहे.
तेथे विद्युत मोटारीद्वारे बांधकामावर पाणी मारताना विजेचा जोरदार धक्का बसून दादासाहेब खाली कोसळले. शेजाऱ्यांनी त्यांना कोल्हापूरातील सुळकुड (ता. कागल) येथे उपचारासाठी दाखल केले. पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डांगे मृत झाल्याचे सांगितले. मृतदेह येथील गांधी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेला. निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून मृतदेह रात्री उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
मृत डांगे यांच्या मागे पत्नी, विवाहित मुलगी, अविवाहित मुलगा असा परिवार आहे. डांगे हालसिद्धनाथ सहकारी कारखान्यात कर्मचारी होते. दीड वर्षापूर्वी त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया केली होती. तेथे नवीन कृत्रिम पाय बसविण्यात येणार होता. तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला. हेस्कॉमने डांगे कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : बांधकामावर पाणी मारत असताना विजेचा धक्का बसून मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm