बेळगाव : भंगार रिक्षाचे सुटेभाग जोडून बनवली नवीन रिक्षा अन् विकली; चौघांना अटक

बेळगाव : भंगार रिक्षाचे सुटेभाग जोडून बनवली नवीन रिक्षा अन् विकली;
चौघांना अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : घरासमोर लावलेल्या जुन्या रिक्षा चोरून तसेच नादुरुस्त व खराब भंगार रिक्षांचे सुटेभाग जोडून नवीन रिक्षा असल्याचे भासवून तिची विक्री केल्याच्या आरोपाखाली चौघांना खडेबाजार पोलिसांनी गुरुवारी (4 मार्च) अटक केली. पोलिसांनी रिक्षा जप्त करून संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. सतीश सुरेश देवलोजी (वय 38, रा. सरस्वतीनगर, नाथ पै सर्कल, शहापूर), रोहित कैलास अगरवाल (वय 40, रेणुका हॉटेल, न्यू गुड्सशेड रोड), समीरउल्ला नासीर डांगे (वय 39, न्यू गांधीनगर) आणि अश्पाक अहमद अबुफरज बेपारी (वय 29, रा. संभाजी रोड, खासबाग) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, उपरोक्त संशयितांकडून शास्त्रीनगर येथील वर्षा विजय लालवानी यांची फसवणूक करण्यात आली आहे. जुन्या आणि खराब रिक्षांचे सुटेभाग जोडून नवीन रिक्षा असल्याचे भासवत तिची विक्री केल्याचा आरोप श्रीमती लालवानी यांनी केला आहे. तसेच याबाबत खडेबाजार पोलिसांत फिर्याद दिली होती.
घरासमोर लावलेल्या जुन्या रिक्षा चोरून त्याचे सुटे भाग नेऊन नवीन रिक्षा तयार करायची व ती स्वतः वापरायची अथवा एखाद्याला विकायची. असा चोरीचा प्रकार करणाऱ्या चौकडीला खडेबाजार पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी याप्रकरणी चौकशी करुन वरील संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. तसेच त्यांना अटक करुन रिक्षाही जप्त करण्यात आली. खडेबाजार पोलिस ठाण्याचे निरीक्षक धीरज शिंदे पुढील तपास करत आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : भंगार रिक्षाचे सुटेभाग जोडून बनवली नवीन रिक्षा अन् विकली; चौघांना अटक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm