बेळगाव : जारकीहोळींच्या कटआऊटला दुग्धाभिषेक;

बेळगाव : जारकीहोळींच्या कटआऊटला दुग्धाभिषेक;

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : कर्नाटकाचे जलसंपदामंत्री आणि बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी अश्लील व्हिडिओ सीडी प्रकरणानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचा मतदारसंघ असलेल्या गोकाकमध्ये बसवेश्वर चौकात भला मोठा त्यांच्या बॅनरला दुग्धाभिषेक करण्यात आला. माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत. राजकीय द्वेषातून षडयंत्र रचून हे कृत्य करण्यात आले आहे, असे सांगत यरगट्टी येथे कार्यकर्त्यांकडून त्यांच्या कटआऊटला दुग्धाभिषेक करण्यात आला.
जारकीहोळी हे निर्दोष आहेत. राजकारणातील त्यांचा वाढता दबदबा न पाहवल्याने हे कृत्य करण्यात आले आहे. आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत, असे सांगत कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात करण्यात आलेल्या आरोपांचा निषेध केला.
बेंगलुरू येथील नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कल्लहळ्ळी यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. रमेश जारकीहोळी यांची अश्लील सीडी सार्वजनिक झाली आहे. हे व्हिडीओ व्हायरल करताना दिनेश यांनी रमेश जारकीहोळी यांनी नोकरीचं आमिष दाखवून युवतीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. यामध्ये रमेश जारकीहोळी कथितरित्या एका तरुणीसोबत दिसून येत आहेत.
दिनेश यांनी सांगितले की मी याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याबाबत चैाकशी करावी. दिनेश यांनी पोलिसात धाव घेऊन सखोल चौकशीची आणि तरुणीला सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. कर्नाटक ट्रान्समिशन कॉरपोरेशन लिमिटेड (KPTCL) मध्ये तरुणीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून शारिरिक संबंध ठेण्यास सांगितल्याचा आरोप दिनेश कल्लहळ्ळी यांनी केला आहे. यासंदर्भात दिनेश कल्लहळ्ळी यांनी रमेश जारकीहोळी यांची एक सीडी व्हायरल केली आहे. यामध्ये रमेश जारकीहोळी हे एका तरुणीला शरीरसंबंध ठेवण्याबाबत बोलत असल्याचा दावा केला आहे. संबंधित तरुणीच्या कुटुंबीयांनी न्यायासाठी आपल्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांत तक्रार केली, असे दिनेश यांनी म्हटले आहे. बंगळुरुचे पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रारही दाखल केली आहे. तसेच, या प्रकरणाचा तातडीने तपास करावा आणि पीडित तरुणीला आणि तिच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्याची मागणी दिनेश यांनी केली आहे.
नोकरी देण्यास नकार, तरुणीकडून व्हिडीओ व्हायरल?
उत्तर कर्नाटकातील एका तरुणी बंगळूरमधील आरटी नगर परिसरातील वसतीगृहात वास्तव्यास आहे. धरणाच्या शॉर्टफिल्म तयार करण्याच्या उद्देशाने तिने पालकमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यासाठी तिला त्यांनी मदतही केली. परंतु, त्यानंतर तिला केपीटीसीएलमध्ये नोकरी लावण्याचे अमिष दाखवून युवतीवर अत्याचार केल्याचा आरोप रमेश जारकीहोळी यांच्यावर करण्यात आला आहे. मात्र पुढे नोकरी देण्यास नकार दिल्यानंतर तरुणीने जारकीहोळी यांच्यासोबतचे काही व्हिडीओ क्षण रेकॉर्ड केले. बाब समजल्यानंतर जारकीहोळी यांनी संबंधित तरुणीला याचे वाईट परिणाम होतील अशी धमकी दिल्याचीही माहिती मिळत आहे. दरम्यान, व्हायरल झालेले हे व्हिडिओ साधारण महिनाभरापूर्वीचे असल्याचं सांगितलं जात आहे.
कुटुंबाला धमकी : दिनेश म्हणाले, जारकीहोळी यांनी काही काळानंतर त्या युवती दुर्लक्ष केले. या घटनेचा तरुणीने व्हिडिओ बनविल्याची माहिती जारकीहोळी यांना मिळाल्यानंतर त्यांनी या तरुणीसह तिच्या कुटुंबियांना सीडी देण्याबाबत धमकी दिली. सीडी बाहेर पडली तर तुम्हाला सोडणार नाही, अशी भितीही या तरुणीसह कुटुंबाला घातल्याने ती तरुणी व कुटुंबीय समोर आलेले नाही. त्यामुळे आपण समोर येऊन ही माहिती देत आहे.


ब्लॅकमेल की फसवणूक? सीडीची चर्चा संपूर्ण राज्यभर सुरू असल्याने राजकीय धुळवड सुरू झाली आहे. विरोधकांकडून आरोप सुरू झाला असून, सत्ताधारी भाजपचे नेते मात्र तथ्य आढळल्यास व आरोप सिद्ध झाल्यास कारवाई करू, असे सांगत आहेत. हा प्रकार नेमका ब्लॅकमेलिंगचा आहे की त्या तरुणीची खरोखरच फसवणूक आहे, याचा सखोल तपास करावा, अशी मागणीही होत आहे.
Video :
https://youtu.be/O4cjw4425Fo
https://youtu.be/KbEHswVts5U
https://youtu.be/mXkIC24CvOw
https://youtu.be/ahERpS6hOwM
https://youtu.be/Bs3dOfCCJAs

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : जारकीहोळींच्या कटआऊटला दुग्धाभिषेक;

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm