बेळगाव शहरात जारकीहोळींच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा; आमचे साहेब... VIDEO; न विसरणारा मोर्चा..

बेळगाव शहरात जारकीहोळींच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा;
आमचे साहेब... VIDEO;
न विसरणारा मोर्चा..

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : अश्लिल सीडीप्रकरणी राजीनामा दिलेले रमेश जारकीहोळी यांच्या समर्थनार्थ त्यांच्या समर्थकांनी गुरुवारी (4 मार्च) रोजी बेळगाव शहरामध्ये मोर्चा काढला. कर्नाटकाचे जलसंपदामंत्री आणि बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी अश्लील व्हिडिओ सीडी प्रकरणानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी चन्नमा चौकामध्ये धरणे आंदोलन करून रास्ता रोको केला.
सीडी प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यात यावी आणि त्यांना न्याय द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून यावेळी करण्यात आली. माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत. राजकीय द्वेषातून षडयंत्र रचून हे कृत्य करण्यात आले आहे, असे सांगत माजी महापौर शिवाजी सुंठकर आणि जिल्हा पंचायत सदस्य मोहन मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. जारकीहोळी हे निर्दोष आहेत. आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत, असे सांगत कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात करण्यात आलेल्या आरोपांचा निषेध केला.
YouTube Video

या आंदोलनामध्ये बेळगाव तालुक्यातील अनेक गावातील ग्रामपंचायत सदस्य आणि अध्यक्ष सहभागी झाले होते.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची टिका
हा मोर्चा पूर्ण बेळगावकरांच्या लक्षात राहणारा आहे. बेळगावात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि भगव्याचा अपमान झाल्यावर कधी समोर न येणारे आता 4 पैश्यासाठी एका अश्लील नेत्याच्या सपोर्टसाठी भव्य मोर्चा काढले. या मोर्चाला गेलेल्या लोकांना सांगायचं आहे की आशीच ताकद जेव्हा छत्रपतींचा अपमान होतो तेव्हा पण दाखवा आवाज उठवून दाखवा.
YouTube Video

Watch YouTube VIDEO 1
Watch YouTube VIDEO 2

काय आहे रमेश जारकीहोळी यांचे अश्लील सीडी आणि आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरण सीडी प्रकरण भाजपाच्या मंत्र्याला भोवलं; रमेश जारकीहोळी यांचा राजीनामा
कर्नाटकात एका आक्षेपार्ह अश्लील सीडी प्रकरणावरून मोठी खळबळ उडाली आहे. या आक्षेपार्ह सेक्स स्कँडलमध्ये कर्नाटकच्या भाजपा सरकारमधील जलसंसाधन (जलसंपदा) मंत्री, कर्नाटकमधील भाजपचे नेते, बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. जारकीहोळी यांचा कर्नाटक सरकारमध्ये चांगलाच दबदबा आहे. कर्नाटकमधील काँग्रेसचं सरकार पाडण्यात जारकीहोळी यांची भूमिका महत्त्वाची होती. यावेळी काँग्रेसचे 17 आमदार फुटल्यामुळे काँग्रेसचं सरकार पडलं होतं आणि येडियुरप्पा पुन्हा एकदा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले.
बेंगलुरू येथील नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कल्लहळ्ळी यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. रमेश जारकीहोळी यांची अश्लील सीडी सार्वजनिक झाली आहे. हे व्हिडीओ व्हायरल करताना दिनेश यांनी रमेश जारकीहोळी यांच्यावर गंभीर आरोपही केला आहे. जारकीहोळी यांनी नोकरीचं आमिष दाखवून युवतीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप दिनेश यांनी केला आहे. यामध्ये रमेश जारकीहोळी कथितरित्या एका तरुणीसोबत दिसून येत आहेत. दिनेश यांनी सांगितले की मी याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याबाबत चैाकशी करावी. दिनेश यांनी पोलिसात धाव घेऊन सखोल चौकशीची आणि तरुणीला सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. या सीडीमुळे रमेश जारकीहोळी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
कर्नाटक ट्रान्समिशन कॉरपोरेशन लिमिटेड (KPTCL) मध्ये तरुणीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून शारिरिक संबंध ठेण्यास सांगितल्याचा आरोप दिनेश यांनी केला आहे. यासंदर्भात दिनेश यांनी रमेश जारकीहोळी यांची एक सीडी व्हायरल केली आहे. यामध्ये रमेश जारकीहोळी हे एका तरुणीला शरीरसंबंध ठेवण्याबाबत बोलत असल्याचा दावा केला आहे. संबंधित तरुणीच्या कुटुंबीयांनी न्यायासाठी आपल्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांत तक्रार केली, असे दिनेश यांनी म्हटले आहे. बंगळुरुचे पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रारही दाखल केली आहे. तसेच, या प्रकरणाचा तातडीने तपास करावा आणि पीडित तरुणीला आणि तिच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्याची मागणी दिनेश यांनी केली आहे.
नोकरी देण्यास नकार, तरुणीकडून व्हिडीओ व्हायरल?
उत्तर कर्नाटकातील एका तरुणी बंगळूरमधील आरटी नगर परिसरातील वसतीगृहात वास्तव्यास आहे. धरणाच्या शॉर्टफिल्म तयार करण्याच्या उद्देशाने तिने पालकमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यासाठी तिला त्यांनी मदतही केली. परंतु, त्यानंतर तिला केपीटीसीएलमध्ये नोकरी लावण्याचे अमिष दाखवून युवतीवर अत्याचार केल्याचा आरोप रमेश जारकीहोळी यांच्यावर करण्यात आला आहे. मात्र पुढे नोकरी देण्यास नकार दिल्यानंतर तरुणीने जारकीहोळी यांच्यासोबतचे काही व्हिडीओ क्षण रेकॉर्ड केले. बाब समजल्यानंतर जारकीहोळी यांनी संबंधित तरुणीला याचे वाईट परिणाम होतील अशी धमकी दिल्याचीही माहिती मिळत आहे. दरम्यान, व्हायरल झालेले हे व्हिडिओ साधारण महिनाभरापूर्वीचे असल्याचं सांगितलं जात आहे.
कुटुंबाला धमकी : दिनेश म्हणाले, जारकीहोळी यांनी काही काळानंतर त्या युवती दुर्लक्ष केले. या घटनेचा तरुणीने व्हिडिओ बनविल्याची माहिती जारकीहोळी यांना मिळाल्यानंतर त्यांनी या तरुणीसह तिच्या कुटुंबियांना सीडी देण्याबाबत धमकी दिली. सीडी बाहेर पडली तर तुम्हाला सोडणार नाही, अशी भितीही या तरुणीसह कुटुंबाला घातल्याने ती तरुणी व कुटुंबीय समोर आलेले नाही. त्यामुळे आपण समोर येऊन ही माहिती देत आहे.
ब्लॅकमेल की फसवणूक? सीडीची चर्चा संपूर्ण राज्यभर सुरू असल्याने राजकीय धुळवड सुरू झाली आहे. विरोधकांकडून आरोप सुरू झाला आहे. हा प्रकार नेमका ब्लॅकमेलिंगचा आहे की त्या तरुणीची खरोखरच फसवणूक आहे, याचा सखोल तपास करावा, अशी मागणीही होत आहे.
Video :
https://youtu.be/O4cjw4425Fo
https://youtu.be/KbEHswVts5U
https://youtu.be/mXkIC24CvOw
https://youtu.be/ahERpS6hOwM
https://youtu.be/Bs3dOfCCJAs
जारकीहोळी यांचा राजीनामा इतक्या तातडीने का घेतला? केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच चार राज्यांच्या आणि एका केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. यामध्ये दक्षिणेतील तीन राज्यांचा समावेश आहे. तसेच बेळगाव लोकसभा पोटनिवडणूकही होणार आहे. त्यामुळे निवडणुकीत भाजपला याप्रकरणाचा फटका बसू शकतो. त्यामुळेच रमेश जारकीहोळी यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव शहरात जारकीहोळींच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा; आमचे साहेब... VIDEO; न विसरणारा मोर्चा..

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm