बेळगाव : जांबोटी - चोर्ला मार्गावरील पुलावर ट्रक उभा पलटी; टायर पुलावर तर केबिन नाल्यात

बेळगाव : जांबोटी - चोर्ला मार्गावरील पुलावर ट्रक उभा पलटी;
टायर पुलावर तर केबिन नाल्यात

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. खानापूर : जांबोटी - चोर्ला मार्गावरील बेटणे गावाजवळील कासारी नाल्यावरील पुलावर मालवाहू रिकामा ट्रक नाल्यात पलटी झाला आहे. आज (5 मार्च शुक्रवार) पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. बेटणे गावाजवळील उतरतीला चालकाचे नियंत्रण गाडीवरील सुटल्याने ट्रक नाल्यात कोसळला.
गोव्याहून बेळगावच्या दिशेने येणारा हा ट्रक रिकामी होता. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. केबिनमध्ये अडकलेले चालक व क्लिनर सुखरूपपणे बाहेर पडले. कासारी नाल्यात थोडेच पाणी आहे. त्यामुळे क्लिनर व चालकाला केबिन तोडून बाहेर येणे शक्य झाले. ट्रकचे पाठीमागचे टायर पुलावरच अडकले होते तर केबिन नाल्यात होता.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : जांबोटी - चोर्ला मार्गावरील पुलावर ट्रक उभा पलटी; टायर पुलावर तर केबिन नाल्यात

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm