बेळगाव : अल्पवयीन मुलीचे अपहरण; युवकावर गुन्हा दाखल;

बेळगाव : अल्पवयीन मुलीचे अपहरण;
युवकावर गुन्हा दाखल;

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव तालुक्यातील कडोली येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. चार दिवसांपूर्वी ही घटना घडली असून गुरुवारी (4 मार्च) या प्रकरणी काकती पोलीस स्थानकात पोक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. उपलब्ध माहितीनुसार 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. 1 मार्च रोजी ही घटना घडली आहे. या प्रकरणी बसवराज मारुती शिंदोळकर (वय 24, रा. घुग्रेनट्टी, ता. बेळगाव) याच्यावर संशय व्यक्त करत त्याच्याविरोधात मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.
तरुणाविरुद्ध काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सदर युवती कडोली येथील आहे. सेंट्रिंग काम करणाऱ्या बसवराज याच्याशी तिची ओळख झाली. 1 मार्चपासून मुलगी बेपत्ता असल्याचे सांगत मुलीच्या आईने पोलिसांत फिर्याद दिली. सदर युवती अल्पवयीन असल्यान अपहरणाचा गुन्हा दाखल करून घेतला आहे.
पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळळूर व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत. सध्या अपहृत अल्पवयीन मुलगी कोठे आहे...? याचा शोध घेण्यात येत आहे. बेळगाव शहर व तालुक्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरण वाढले आहेत. यापैकी अनेक प्रकरणे प्रेम प्रकरणातून घडली आहेत. काकती पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून त्या मुलीचा शोध घेण्यात येत आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : अल्पवयीन मुलीचे अपहरण; युवकावर गुन्हा दाखल;

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm