जो गुन्हा केलाच नव्हता, त्याबद्दल 20 वर्षं शिक्षा भोगून 'तो' अखेर जेलबाहेर आला; पण...

जो गुन्हा केलाच नव्हता, त्याबद्दल 20 वर्षं शिक्षा भोगून 'तो' अखेर जेलबाहेर आला;
पण...

belgavkar.com | belgaum | belgavkar

हातात पैसा, ओळख नसेल तर स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करायला कसा आणि किती वेळ लागतो, याची साक्ष देत 43 वर्षांचा विष्णू आता तुरुंगाबाहेर आला आहे. अनुसूचित जातीच्या महिलेवर बलात्कार केला म्हणून त्याला ट्रायल कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. बलात्काराच्या आरोपात 20 वर्षांपासून तुरुंगात असलेल्या विष्णू तिवारी नावाच्या व्यक्तीची उच्च न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली. तब्बल 2 दशकांनंतर विष्णू तिवारी तुरुंगातून बाहेर आले. त्यांना 3 वर्षे ललितपूरच्या, तर 17 वर्षे केंद्रीय कारागृहात ठेवण्यात आलं होतं. ललितपूरमधल्या महरौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या सिलावन गावातल्या महिलेनं बलात्काराचा आरोप केल्यानं विष्णू यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली.
बलात्कार प्रकरणात गेल्या 20 वर्षांपासून तुरुंगात असलेल्या विष्णू यांची दोनच दिवसांपूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली. तिवारी 23 वर्षांचे असताना ट्रायल कोर्टानं त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ते बलात्काराच्या आरोपात दोषी आढळले होते. आता 20 वर्षांनंतर उच्च न्यायालयानं त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. पण या कालावधीत त्यांनी स्वत:चे आई-वडील आणि दोन मोठे भाऊ गमावले.
गावापासून 30 किमी अंतरावरच्या दुसऱ्या गावातल्या एका SC महिलेनं त्याच्यावर बलात्काराचा आरोप ठेवला. वर्ष 2000 मध्ये दुसऱ्या एका गावातल्या महिलेनं त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला. अनुसूचित जातीच्या महिलेवर बलात्कार केल्याचा, धमकी दिल्याचा, लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा विष्णू यांच्यावर दाखल करण्यात आला. त्यावेळी विष्णू वडील आणि दोन भावांसोबत राहायचे. कुटुंबाला मदत करण्यासाठी ते नोकरी करत होते. खटला दाखल झाला. अनुसूचित जातीच्या महिलेवर बलात्कार केला म्हणून त्याला ट्रायल कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आपण निर्दोष असल्याचंं विष्णू सांगत राहिला, पण ते सिद्ध करण्यासाठी कोर्टापुढे पुरावे सादर करू शकला नाही. वकील नेमू शकला नाही.
वडील, भावंडांच्या अंत्यसंस्कारांना मुकले : .ट्रायल कोर्टानं विष्णू तिवारींना दोषी ठरवलं. त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 2003 मध्ये त्यांची रवानगी आग्र्यातील मध्यवर्ती तुरुंगात करण्यात आली. 2005 मध्ये विष्णू यांनी ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला हाय कोर्टात आव्हान देण्याचा विचार केला. मात्र त्यांना आव्हान देता आलं नाही. सहा वर्षांपूर्वी विष्णू यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. पण पॅरोल न मिळाल्यानं त्यांना वडिलांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहता आलं नाही. दोन भावांच्या अंत्यविधींसाठीदेखील त्यांना पॅरोल मिळाला नाही. या 20 वर्षांत विष्णूच्या कुटुंबातले सगळे सदस्य मृत्यू पावले. त्याला या जगात जवळचं असं कोणी नाही. उमेदीची वर्षं तुरुंगात गेली. तरी त्याने हार मानलेली नाही. तुरुंगात असताना तो कैद्यांचं जेवण तयार करायचा. स्वयंपाकात त्याचा हातखंडा होता. आता 43 व्या वर्षी सुटका झाल्यानंतर आपला ढाबा सुरू करण्याचं त्याच्या मनात आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

जो गुन्हा केलाच नव्हता, त्याबद्दल 20 वर्षं शिक्षा भोगून 'तो' अखेर जेलबाहेर आला; पण...

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm