सीडी प्रकरण; 'ती' वादग्रस्त टेप झाली लीक; येडियुरप्पांनी प्रचंड भ्रष्टाचार केला VIDEO

सीडी प्रकरण;
'ती' वादग्रस्त टेप झाली लीक;
येडियुरप्पांनी प्रचंड भ्रष्टाचार केला VIDEO

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटकमध्ये एका आक्षेपार्ह सीडी प्रकरणावरून मोठी खळबळ उडाली आहे. या आक्षेपार्ह सीडी प्रकरणात राजीनामा दिलेल्या कर्नाटकच्या भाजपा सरकारमधील जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका सामाजिक कार्यकर्त्यांने ही सीडी जारी केली आहे, यामध्ये रमेश जारकीहोळी कथितरित्या एका तरुणीसोबत दिसून येत आहेत. दरम्यान, याबाबत राजकीय षड्यंत्र असल्याचे रमेश जारकीहोळी यांनी म्हटलं आहे. मात्र आता भाजपाच्या मंत्र्याला हे आक्षेपार्ह सीडी प्रकरण भोवलं असून रमेश जारकीहोळी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर आता जारकीहोळी यांचं वादग्रस्त संभाषण लीक झालं आहे. 
रमेश जारकीहोळी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्प यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. येडियुरप्पा यांनी खूप भ्रष्टाचार केला आहे आणि केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी कर्नाटकचे मुख्यमंत्री होतील असं जारकीहोळी यांनी म्हटलं आहे. तसेच मराठी लोक चांगले आहेत आणि ... कानडींना काही काम नाही असं देखील जारकीहोळी यांनी म्हटलं आहे. सध्या हे संभाषण जोरदार व्हायरल होत आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्री येडियुरप्पांवर जोरदार टीका केली. हे केवळ सेक्स स्कँडल नाही. त्या टेपमध्ये मंत्र्यांनीच मुख्यमंत्री येडियुरप्पा भ्रष्टाचारी असल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांना याचं उत्तर द्यावं लागेल असं म्हटलं आहे. 
YouTube Video

रमेश जारकीहोळी आणि त्या महिलेचं समोर आलेलं संभाषण
महिला - बेळगावात मराठी-कन्नड संघर्ष सारखा सुरू आहे?
जारकीहोळी  - मराठी माणसं चांगली आहेत. ... कानडींना काही काम नाही.
जारकीहोळी - सिद्धरामय्या उत्तम आहेत. येडियुरप्पांनी प्रचंड भ्रष्टाचार केला आहे.
महिला - तुम्ही सारखे दिल्लीला जात असता, तुम्ही मुख्यमंत्री होणार का?
जारकीहोळी -  प्रल्हाद जोशी मुख्यमंत्री होतील.
नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी हे सीडी प्रकरण मीडियासमोर आणले आहे. तसेच, दिनेश कलहळ्ली यांनी रमेश जारकीहोळी यांच्यावर गंभीर आरोपही केला आहे. रमेश जारकीहोळी यांनी नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप दिनेश कलहळ्ळी यांनी केला आहे.
कर्नाटक ट्रान्समिशन कॉरपोरेशन लिमिटेड (KPTCL) मध्ये तरुणीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून शारिरिक संबंध ठेण्यास सांगितल्याचा आरोप दिनेश यांनी केला आहे. यासंदर्भात दिनेश यांनी रमेश जारकीहोळी यांची एक सीडी व्हायरल केली आहे. यामध्ये रमेश जारकीहोळी हे एका तरुणीला शरीरसंबंध ठेवण्याबाबत बोलत असल्याचा दावा केला आहे. संबंधित तरुणीच्या कुटुंबीयांनी न्यायासाठी आपल्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांत तक्रार केली, असे दिनेश यांनी म्हटले आहे. बंगळुरुचे पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रारही दाखल केली आहे. तसेच, या प्रकरणाचा तातडीने तपास करावा आणि पीडित तरुणीला आणि तिच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्याची मागणी दिनेश यांनी केली आहे.
नोकरी देण्यास नकार, तरुणीकडून व्हिडीओ व्हायरल?
उत्तर कर्नाटकातील एका तरुणी बंगळूरमधील आरटी नगर परिसरातील वसतीगृहात वास्तव्यास आहे. धरणाच्या शॉर्टफिल्म तयार करण्याच्या उद्देशाने तिने पालकमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यासाठी तिला त्यांनी मदतही केली. परंतु, त्यानंतर तिला केपीटीसीएलमध्ये नोकरी लावण्याचे अमिष दाखवून युवतीवर अत्याचार केल्याचा आरोप रमेश जारकीहोळी यांच्यावर करण्यात आला आहे. मात्र पुढे नोकरी देण्यास नकार दिल्यानंतर तरुणीने जारकीहोळी यांच्यासोबतचे काही व्हिडीओ क्षण रेकॉर्ड केले. बाब समजल्यानंतर जारकीहोळी यांनी संबंधित तरुणीला याचे वाईट परिणाम होतील अशी धमकी दिल्याचीही माहिती मिळत आहे. दरम्यान, व्हायरल झालेले हे व्हिडिओ साधारण महिनाभरापूर्वीचे असल्याचं सांगितलं जात आहे.
कुटुंबाला धमकी : दिनेश म्हणाले, जारकीहोळी यांनी काही काळानंतर त्या युवती दुर्लक्ष केले. या घटनेचा तरुणीने व्हिडिओ बनविल्याची माहिती जारकीहोळी यांना मिळाल्यानंतर त्यांनी या तरुणीसह तिच्या कुटुंबियांना सीडी देण्याबाबत धमकी दिली. सीडी बाहेर पडली तर तुम्हाला सोडणार नाही, अशी भितीही या तरुणीसह कुटुंबाला घातल्याने ती तरुणी व कुटुंबीय समोर आलेले नाही. त्यामुळे आपण समोर येऊन ही माहिती देत आहे.
ब्लॅकमेल की फसवणूक? सीडीची चर्चा संपूर्ण राज्यभर सुरू असल्याने राजकीय धुळवड सुरू झाली आहे. विरोधकांकडून आरोप सुरू झाला आहे. हा प्रकार नेमका ब्लॅकमेलिंगचा आहे की त्या तरुणीची खरोखरच फसवणूक आहे, याचा सखोल तपास करावा, अशी मागणीही होत आहे.
Video :
https://youtu.be/O4cjw4425Fo
https://youtu.be/KbEHswVts5U
https://youtu.be/mXkIC24CvOw
https://youtu.be/ahERpS6hOwM
https://youtu.be/Bs3dOfCCJAs
जारकीहोळी यांचा राजीनामा इतक्या तातडीने का घेतला? केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच चार राज्यांच्या आणि एका केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. यामध्ये दक्षिणेतील तीन राज्यांचा समावेश आहे. तसेच बेळगाव लोकसभा पोटनिवडणूकही होणार आहे. त्यामुळे निवडणुकीत भाजपला याप्रकरणाचा फटका बसू शकतो. त्यामुळेच रमेश जारकीहोळी यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

सीडी प्रकरण; 'ती' वादग्रस्त टेप झाली लीक; येडियुरप्पांनी प्रचंड भ्रष्टाचार केला VIDEO

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm