बेळगाव : दोन्ही आमदारांनी केली मागणी; आदेश मागे घ्या;

बेळगाव : दोन्ही आमदारांनी केली मागणी;
आदेश मागे घ्या;

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव जिल्ह्यातील 16 मंदिरावर प्रशासक नियुक्तीचा आदेश देण्यात आला आहे. मात्र, या आदेशाला मंदिराचे ट्रस्टी, हिंदू संघटना, भाविक तसेच नागरिकांचा विरोध वाढला आहे. यासंदर्भात आमदार अभय पाटील, आमदार अनिल बेनके यांच्यासह अॅड. एम. बी. जिरली आदींनी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची भेट घेऊन मंदिरावरील प्रशासक नेमणुकीचा आदेश मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. तर या संदर्भात धर्मादाय मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे आमदारांनी यावेळी सांगितले.
याआधी बॉम्बे पब्लिक ट्रस्ट कायद्यांतर्गत मंदिरांचा कारभार चालायचा. हा कायदा रद्द करण्यात आला. सध्याच्या कायद्यामुळे मंदिरांचे तसेच त्यावरील ट्रस्टींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सद्याच्या हिंदू रिलीजीयस अॅक्ट 1999 कायदा राज्यात अस्तित्वात आहे. मात्र, हा कायदा मंदिर व ट्रस्टींसाठी जाचक आहे. या कायद्याविरोधात अनेकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून अनेक खटले प्रलंबित आहेत. तरीही सरकारने मंदिरांवर प्रशासक नेमण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. हिंदू मंदिरांवरील सरकारीकरणाला विरोध दर्शविण्यासाठी आता हिंदू बांधवांनी एकत्रित लढा देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

बेळगाव शहरासह जिल्ह्यातील 16 देवस्थानांवर प्रशासकांची नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हा धर्मादाय विभागाने 18 फेब्रुवारी बजाविले आहेत. जिल्हा धर्मादाय विभागाची 4 फेब्रुवारी रोजी बैठक झाली होती. त्यात विविध देवस्थानांवर प्रशासकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार बेळगाव शहरासह जिल्ह्यातील एकूण 16 देवस्थानांवर प्रशासक नियुक्तीचे आदेश बजाविण्यात आले आहेत. परंतु, प्रशासक कधीपासून कामकाज पाहणार आहे, हे अद्याप स्पष्ट नसले तरी मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात विद्यमान कार्यकारिणीला बाजूला करत संस्था ताब्यात घेण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थान - कपिलेश्वर मंदिर
श्री बनशंकरी देवी देवस्थान, सप्पार गल्ली, वडगाव
श्री अंबाबाई देवस्थान, शहापूर
श्री जिव्हेश्वर देवस्थान, माधवपूर - वडगाव
श्री जालगार मारुती देवस्थान, चव्हाट गल्ली
श्री गजानन भक्त परिवार मंडळ, शांतीनगर, टिळकवाडी
श्री भैरवदेव कलमेश्वर मंदिर, होनगा
बसवन कुडचीतील श्री बसवेश्वर, कलमेश्वर आणि ब्रह्मदेव देवस्थान
श्री लक्कब्बादेवी देवस्थान, बेक्केरी, ता. रायबाग श्री उमा रामेश्वर देवस्थान, रामतीर्थ, ता. अथणी
श्री पंचलिंगेश्वर देवस्थान, मुन्नोळी, ता. सौंदत्ती
श्री बसवेश्वर देवस्थान, खिळेगाव, ता. अथणी
श्री हनुमान देवस्थान, सौंदत्ती


मंदिराच्या गाभाऱ्यात तसेच देवस्थान कामकाजात सरकारचा थेट हस्तक्षेप नाराजीचे कारण ठरले आहे. प्रशासकांच्या नियुक्ती आदेशाविरोधात ट्रस्टी आणि देवस्थान कमिटीच्या सदस्यांकडून विरोध दर्शविण्याची तयारी सुरु आहे. तसेच याप्रकरणी न्यायालयीन लढा देण्याच्याही हालचाली सुरु आहेत. तत्पूर्वी, याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी काही संघटना आणि देवस्थान कमिटीकडून पत्र पाठविले जाणार आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : दोन्ही आमदारांनी केली मागणी; आदेश मागे घ्या;

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm