सीडी प्रकरण बाहेर काढणार्‍याने मागितली वेळ; केली मागणी
भाजपाचे माजी मंत्री रमेश जारकीहोळी आणि सामाजिक कार्यकर्ते दिनेश कल्लहळ्ळी

सीडी प्रकरण बाहेर काढणार्‍याने मागितली वेळ;
केली मागणी

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटक : भाजपाचे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याविरूद्ध एका महिलेवर अत्याचार केल्याची तक्रार दाखल करणारे सामाजिक कार्यकर्ते दिनेश कल्लहळ्ळी यांनी कब्बन पार्क पोलिसांकडे चौकशीसाठी हजर राहण्यासाठी वेळ मागितली आहे. आपल्या जीवाला धोका असल्याने चौकशीसाठी हजर राहू शकत नाही आणि मला सुरक्षाही नाही, असे दिनेश यांनी पोलिसांना लेखी कळविले आहे. जर पोलिस खाते मला सुरक्षा देण्यास तयार असेल तर 9 मार्च रोजी मी पोलिसांसमोर हजर होईन. रमेश जारकिहोळी विरोधात दाखल केलेल्या तक्रारीबद्दल अधिक माहिती हवी असल्याने पोलिस निरीक्षक बी. मारुती यांनी त्यांना हजर राहायला सांगितले होते.
दिनेश यांनी शेवटच्या हालचालीपर्यंत आपल्या कायदेशीर सल्लागारांशी संपर्क साधला आणि त्यानंतर पोलिसांना कळवले. 2 मार्च रोजी तक्रार नोंदवताना त्यांनी एक सीडी दिली. परंतु त्यांनी सीडी देणाऱ्या महिलेची आणि तिच्या नातेवाईकांची माहिती दिली नाही. ही प्राथमिक माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती. त्यांना लवकरच पोलिस आणखी एक नोटीस बजावू शकतात. दिनेश यांनी रामनगर ग्रामीण पोलिसांकडे आपला आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या जीवितासाठी संरक्षण मिळावे, यासाठी याचिका दाखल केली होती. त्यांना धमकीचे कॉल येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रमेश जारकीहोळीविरोधात तक्रार दिल्यानंतर काही अज्ञात लोक त्यांचा पाठलाग करीत असल्याची त्यांची तक्रार आहे.
तक्रारदाराविरुद्धच तक्रार : रमेश जारकीहोळीच्या कथित सीडीमुळे राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण झाले आहे. जारकीहोळींविरोधात कब्बन पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून तपास सुरू आहे. आता तक्रारदार आणि सामाजिक कार्यकर्ते दिनेश कल्लहोळ्ळी यांच्याविरूद्धही कब्बन पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. सीडी रीलिज करण्यामागे एक राजकीय षडयंत्र आहे. राजकीय अस्थिरतेने मंत्र्यांची बदनामी झाल्याची तक्रार कन्नड समर्थक संघाचे अध्यक्ष पुट्टेगौडा यांनी दिनेश कल्लहोळी यांच्याविरुध्द तक्रार दाखल केली आहे. कल्लहोळींचा रासलीला प्रकरणाशी काही संबंध नाही. जर त्या मुलीवर अन्याय झाला असेल तर तिने स्वत : तक्रार का दिली नाही ? हे ब्लॅकमेल राजकारण असल्याचा आरोप पुट्टेगौडा यांनी केला.
बेंगलुरू येथील नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कल्लहळ्ळी यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. रमेश जारकीहोळी यांची अश्लील सीडी सार्वजनिक झाली आहे. हे व्हिडीओ व्हायरल करताना दिनेश यांनी रमेश जारकीहोळी यांच्यावर गंभीर आरोपही केला आहे. जारकीहोळी यांनी नोकरीचं आमिष दाखवून युवतीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप दिनेश यांनी केला आहे. यामध्ये रमेश जारकीहोळी कथितरित्या एका तरुणीसोबत दिसून येत आहेत. दिनेश यांनी सांगितले की मी याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याबाबत चैाकशी करावी. दिनेश यांनी पोलिसात धाव घेऊन सखोल चौकशीची आणि तरुणीला सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. या सीडीमुळे रमेश जारकीहोळी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
कर्नाटक ट्रान्समिशन कॉरपोरेशन लिमिटेड (KPTCL) मध्ये तरुणीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून शारिरिक संबंध ठेण्यास सांगितल्याचा आरोप दिनेश यांनी केला आहे. यासंदर्भात दिनेश यांनी रमेश जारकीहोळी यांची एक सीडी व्हायरल केली आहे. यामध्ये रमेश जारकीहोळी हे एका तरुणीला शरीरसंबंध ठेवण्याबाबत बोलत असल्याचा दावा केला आहे. संबंधित तरुणीच्या कुटुंबीयांनी न्यायासाठी आपल्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांत तक्रार केली, असे दिनेश यांनी म्हटले आहे. बंगळुरुचे पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रारही दाखल केली आहे. तसेच, या प्रकरणाचा तातडीने तपास करावा आणि पीडित तरुणीला आणि तिच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्याची मागणी दिनेश यांनी केली आहे.
नोकरी देण्यास नकार, तरुणीकडून व्हिडीओ व्हायरल?
उत्तर कर्नाटकातील एका तरुणी बंगळूरमधील आरटी नगर परिसरातील वसतीगृहात वास्तव्यास आहे. धरणाच्या शॉर्टफिल्म तयार करण्याच्या उद्देशाने तिने पालकमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यासाठी तिला त्यांनी मदतही केली. परंतु, त्यानंतर तिला केपीटीसीएलमध्ये नोकरी लावण्याचे अमिष दाखवून युवतीवर अत्याचार केल्याचा आरोप रमेश जारकीहोळी यांच्यावर करण्यात आला आहे. मात्र पुढे नोकरी देण्यास नकार दिल्यानंतर तरुणीने जारकीहोळी यांच्यासोबतचे काही व्हिडीओ क्षण रेकॉर्ड केले. बाब समजल्यानंतर जारकीहोळी यांनी संबंधित तरुणीला याचे वाईट परिणाम होतील अशी धमकी दिल्याचीही माहिती मिळत आहे. दरम्यान, व्हायरल झालेले हे व्हिडिओ साधारण महिनाभरापूर्वीचे असल्याचं सांगितलं जात आहे.
कुटुंबाला धमकी : दिनेश म्हणाले, जारकीहोळी यांनी काही काळानंतर त्या युवती दुर्लक्ष केले. या घटनेचा तरुणीने व्हिडिओ बनविल्याची माहिती जारकीहोळी यांना मिळाल्यानंतर त्यांनी या तरुणीसह तिच्या कुटुंबियांना सीडी देण्याबाबत धमकी दिली. सीडी बाहेर पडली तर तुम्हाला सोडणार नाही, अशी भितीही या तरुणीसह कुटुंबाला घातल्याने ती तरुणी व कुटुंबीय समोर आलेले नाही. त्यामुळे आपण समोर येऊन ही माहिती देत आहे.
ब्लॅकमेल की फसवणूक? सीडीची चर्चा संपूर्ण राज्यभर सुरू असल्याने राजकीय धुळवड सुरू झाली आहे. विरोधकांकडून आरोप सुरू झाला आहे. हा प्रकार नेमका ब्लॅकमेलिंगचा आहे की त्या तरुणीची खरोखरच फसवणूक आहे, याचा सखोल तपास करावा, अशी मागणीही होत आहे.
Video :
Watch YouTube VIDEO 1
Watch YouTube VIDEO 2
Watch YouTube VIDEO 3
Watch YouTube VIDEO 4
Watch YouTube VIDEO 5
जारकीहोळी यांचा राजीनामा इतक्या तातडीने का घेतला? केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच चार राज्यांच्या आणि एका केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. यामध्ये दक्षिणेतील तीन राज्यांचा समावेश आहे. तसेच बेळगाव लोकसभा पोटनिवडणूकही होणार आहे. त्यामुळे निवडणुकीत भाजपला याप्रकरणाचा फटका बसू शकतो. त्यामुळेच रमेश जारकीहोळी यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

सीडी प्रकरण बाहेर काढणार्‍याने मागितली वेळ; केली मागणी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm