बेळगाव : कोरोनाबाधित आमदार लक्ष्मी हेब्बाळकर मतदानाला मुकल्या; जारकीहोळींनी केल मतदान

बेळगाव : कोरोनाबाधित आमदार लक्ष्मी हेब्बाळकर मतदानाला मुकल्या;
जारकीहोळींनी केल मतदान

belgavkar.com | belgaum | belgavkar

माजी मंत्री आमदार रमेश जाराकीहोळी यांचे टपाली मतदान
बेळगाव : कोरोना संसर्गामुळे होम क्वारंटाईन असलेले आ. रमेश जारकीहोळी यांनी लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान पोस्टाने पाठवले आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्यांना निवडणूक आयोगाने पोस्टल मतदान करण्याची सुविधा दिली होती. आ. रमेश जारकीहोळी गेल्या आठवड्यात कोरोनाबाधित झाले. दोन दिवसांपूर्वीच डिस्चार्ज घेऊन ते घरी आले. ते सध्या होम क्वारंटाईन आहेत. त्यामुळे त्यांनी पोस्टद्वारे मतदानाचा हक्क बजावला आहे तर त्यांच्या कुटुंबियांने मतदार केंद्रांवर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी शनिवारी आजी-माजी आमदारांसह अनेक मान्यवरांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. पण, ग्रामीणच्या काँग्रेस आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना कोरोना झाल्यामुळे सध्या त्यांच्यावर त्यांच्या निवासस्थानी उपचार सुरु आहेत. शनिवारी दिवसभर त्या सलाईनवर असल्यामुळे त्यांना मतदानासाठी जाता आले नाही. मात्र, सायंकाळी त्यांनी प्रसिद्धी पत्रक जारी करून पोटनिवडणुकीत काँग्रेस किमान एक लाख मताने विजयी होईल आणि आमदार सतीश जारकीहोळी नवे खासदार बनतील, असा आशावाद व्यक्त केला.
बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक | एकूण मतदान | 9 लाख 79 हजार 693
मतदार संघ एकूण मतदार झालेल मतदान
बेळगाव उत्तर 2 लाख 42 हजार 618 104025
बेळगाव दक्षिण 243027 108962
बेळगाव ग्रामीण 244084 142450
अरभावी 240012 132163
गोकाक 249993 151172
बैलहोंगल 189858 110117
सौंदत्ती-यल्लम्मा 197384 115801
रामदुर्ग 206562 115003
एकूण 18 लाख 13 हजार 538 9 लाख 79 हजार 693
बेळगाव उत्तर-दक्षिण-ग्रामीण मतदान | 355437 मतदान
मतदार संघ एकूण मतदार झालेल मतदान
बेळगाव उत्तर 242618 104025
बेळगाव दक्षिण 243027 108962
बेळगाव ग्रामीण 244084 142450
एकूण 729729 355437
बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक मतदान | 54.02%
विधानसभा मतदार संघ एकूण मतदार झालेल % Voting
बेळगाव उत्तर 2 लाख 42 हजार 618 42.88%
बेळगाव दक्षिण 243027 44.84
बेळगाव ग्रामीण 244084 58.36
अरभावी 240012 55.07
गोकाक 249993 60.47
बैलहोंगल 189858 58
सौंदत्ती-यल्लम्मा 197384 58.67
रामदुर्ग 206562 55.67
एकूण 18 लाख 13 हजार 538 54.02%

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : कोरोनाबाधित आमदार लक्ष्मी हेब्बाळकर मतदानाला मुकल्या; जारकीहोळींनी केल मतदान

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm