बेळगाव : गल्लीच्या सुरक्षेसाठी मास्क, सॅनिटायझर आणि अर्सेनिक अल्बम-30 गोळ्यांचे वितरण

बेळगाव : गल्लीच्या सुरक्षेसाठी मास्क, सॅनिटायझर आणि अर्सेनिक अल्बम-30 गोळ्यांचे वितरण

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : तांगडी गल्ली, कपिलेश्वर रोड, रामा मेस्त्री अड्डा व परिसरात गुरुवारी (6 मे) कोरोना या महाभयंकर रोगावर प्रतिबंधक उपाय म्हणून मास्क, सॅनिटायझर आणि होमिओपथिक अर्सेनिक अल्बम-30 या गोळ्याचे वितरण करण्यात आले. 'माझी गल्ली माझी जबाबदारी' मोहिमेअंतर्गत समाजसेवक कपील भोसले व गल्लीतील नागरीकांच्या हस्ते नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले.
कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेने बेळगाव शहरात तांडव घालणे सुरू केले आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये कोरोना समूह संसर्गाची भीती निर्माण झाली आहे. बेळगाव शहरात सुद्धा कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे समाजसेवक कपील भोसले यांनी स्वखर्चाने सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप केले. सामाजिक बांधिलकी म्हणून स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण करण्यासाठी स्वच्छता आणि सामाजिक अंतरांच्या मूलभूत तत्त्वांचे अनुसरण केले. कोविड विरूद्ध लढा देताना मास्क आणि सॅनिटायजर आमचे मुख्य शस्त्र आहे.
कोरोना या संसर्गजन्य आजाराला हरविण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करीत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनसुद्धा त्यांनी केले आहे. नियमित सॅनिटायझर व मास्कचा वापर आवश्यक आहे. त्यामुळे समाजसेवी कपील भोसले आणि मित्र मंडळांच्या वतीने पुढाकार घेत सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले आहे. तसेच अर्सेनिक अल्बम-30 गोळ्यांचा डोस कोणत्या पद्धतीने घ्यायचे हे नागरीकांना समजावून सांगितले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : गल्लीच्या सुरक्षेसाठी मास्क, सॅनिटायझर आणि अर्सेनिक अल्बम-30 गोळ्यांचे वितरण

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm