CoronaVirus भय इथले संपत नाही! कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती.?

CoronaVirus भय इथले संपत नाही! कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती.?

belgavkar.com | belgaum | belgavkar

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Coronavirus) कहर सुरू आहे. मागील चार दिवसांपासून सलग 4 लाखाहून अधिक दैनंदिन रुग्णसंख्या आढळत आहे. इतकंच नाही तर मृतांचा आकडाही चार हजारावर पोहोचत आहे. अशात लोकांच्या मनात मोठा सवाल आहे, की या लाटेतील रुग्णसंख्येचा उच्चांक (Covid-19) नेमका कधी असेल आणि कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा कधी घटेल. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत देश आणि विदेशातील अनेक तज्ज्ञांनी वेगवेगळे अंदाज वर्तवले आहेत. यानुसार, भारतात दहा दिवसांनंतर सर्वात कठीण परिस्थिती असेल. अनेक तज्ज्ञांनी आपल्या रिपोर्टमध्ये असा दावा केला आहे, की मे महिन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक पाहायला मिळेल.
या काळात देशात 35 ते 40 लाख सक्रीय रुग्ण असतील. तर, अनेक तज्ज्ञांनी असंही म्हटलं आहे, की दुसऱ्या लाटेत जितक्या झपाट्यानं रुग्णसंख्या वाढली, तितक्याच झपाट्यानं ती कमीदेखील होईल. ही बाब दिलासादायक आहे. देशभरात कोरोना संसर्गाचा जोर अजूनही कायम असून, दररोज साडेतीन ते चार लाख रुग्णांची भर पडत आहे. रुग्णसंख्येच्या विस्फोटामुळे आरोग्य सुविधा कोलमडताना दिसत असून, वेळेत उपचार न मिळाल्याने, त्याचबरोबर ऑक्सिजन वा इतर सुविधांअभावी रुग्णांचे प्राण जात आहे. देशातील मृत्यूचा वेग अजूनही कायम असून, दररोज साडेतीन ते चार हजारांच्या सरासरीने मृत्यू होत आहे. त्यामुळे एकूण करोना बळींची संख्या अडीच लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या 24 तासांतील आकेडवारी जाहीर केली आहे. गेल्या 24 तासांतील आकडेवारी मागील काही दिवसांतील आकडेवारीच्या तुलनेत दिलासा देणारी असली, तरी समाधानकारक नसल्याचं दिसत आहे. देशात रविवारी दिवसभरात 3 लाख 66 हजार 161 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर 3 लाख 53 हजार 818 रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब म्हणजे कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूंचं संकट मात्र कायम आहे. देशात गेल्या 24 तासांत 3 हजार 754 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या 2 लाख 46 हजार 116 झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे देशात सध्या 37 लाख 45 हजार 237 रुग्ण उपचार घेत आहेत.
India reports 3,66,161 new #COVID19 cases, 3,53,818 discharges and 3,754 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry
Total cases: 2,26,62,575
Total discharges: 1,86,71,222
Death toll: 2,46,116
Active cases: 37,45,237
Total vaccination: 17,01,76,603
26 राज्यांत लॉकडाउन सदृश्य निर्बंध : देशात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून, आठवडाभरात पाचव्यांदा दैनंदिन रुग्णसंख्या चार लाखांहून अधिक नोंदवण्यात आली आहे. कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी दिल्ली, उत्तर प्रदेश सरकारने निर्बंध आणखी आठवडाभरासाठी वाढविण्याचा निर्णय रविवारी घेतला. रुग्णवाढीमुळे तमिळनाडू, कर्नाटकमध्ये आजपासून (10मे) लॉकडाउन लागू करण्यात येत असून, देशातील जवळपास 26 राज्यांत लॉकडाउनसदृश निर्बंध लागू आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

CoronaVirus भय इथले संपत नाही! कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती.?

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm