बेळगाव : आंबोलीला जाऊन आलेल्या आणि पुन्हा बेळगावातील एका खाजगी लॉजवर राहिलेल्या पर्यटक तरुणाचा बेळगावात मृत्यू झाला. संदेश षन्मुख जाडगौड (वय 23, रा. होनट्टी, ता. बनहट्टी, जि. बागलकोट) असे मृताचे नाव आहे. संदेश व त्याचे काही मित्र बनहट्टी तालुक्यातून आंबोलीला आले होते. शनिवारी ते आंबोलीला जाऊन आले.
गावी जायला रात्र होणार म्हणून हे सर्वजण बेळगाव शहरातील रक्षित लॉजमध्ये राहिले. रात्री संदेशला अस्वस्थ वाटून उलट्या सुरू झाल्या. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचाराचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला. अतिमद्य प्राशनाचा त्रास झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. माळमारुती पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.