बेळगाव : मराठी भाषिक युवा आघाडीचे अध्यक्ष भाऊराव गडकरी यांनी शांताई वृद्धाश्रमाला ₹ 11000 रुपयांची देणगी दिली आहे. शांताईचे संचालक माजी महापौर विजय मोरे यांच्याकांडे गडकरी यांनी ही रक्कम सुपूर्द केली. यावेळी येळ्ळूर ग्राम पंचायतीचे माजी सदस्य सतीश कुगजी, एसएम बेळवटकर, नेताजी शिंदे आदी उपस्थित होते.
शांताई वृद्धाश्रमात करण्यात येत असलेल्या विकास कामात हातभार लावण्यासाठी मदत केल्याची माहिती यावेळी गडकरी यांनी दिली.