बेळगाव : रायबाग तालुक्यातील अलकनूर गावातील 2 वर्षीय बालक खेळताना बोअरवेलमध्ये पडल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी बालक शरत सिद्धप्पा हसारे बेपत्ता झाल्याची तक्रार हारुगेरी पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. बालकाचे अपहरण झाल्याचा संशय होता. पण तो मुलगा बोअरवेलमध्ये पडला असल्याची माहिती आहे.
अग्निशमन दल आता बालकाला काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. सुमारे 10 ते 12 फूट खोल बोअरवेलमध्ये बालक अडकले असावे असा संशय आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून खासदारांनी मुलाच्या संरक्षणासाठी सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Latest Update 9PM : त्या दुर्देवी बालकाचा बोअरवेलमध्ये मृत्यू झाला आहे. याप्रकरणी बालकाच्या आजीने मुलाच्या वडिलांवर गंभीर आरोप केला आहे. निर्दयी बापानेच बालकाला मारल्याचा संशय व्यक्त होत आहे. मुलाच्या आजीने सांगितले आहे की, घरात कोणी नसताना मुलाच्या वडिलांनी दोन वर्षांच्या बाळाचा पाय बांधला होता. त्याचा खून झाला असून पोलिसांनी बापाला अटक केली आहे. खूनाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. वडिल सिध्दप्पा यांनी 4 वर्षाचा आणखीन एक मुलगा आहे.