बेळगाव : धावत्या रेल्वेतून पडून एका अनोळखी वृद्धेचा मृत्यू झाला आहे. रविवारी बेळगाव - देसूर रेल्वेस्थानकादरम्यान ही घटना उघडकीस आली असून रेल्वे पोलिसांनी सुमारे 65 ते 70 वर्षीय अनोळखी वृद्धेचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. रेल्वे रुळाशेजारी या वृद्धेचा मृतदेह आढळून आला आहे.
अंगाने सडपातळ, काळसर वर्ण, सरळ नाक, उभट चेहरा असे तिचे वर्णन असून तिच्या उजव्या हातावर फुलाचे चित्र गोंदले आहे. हातात पितळी बांगड्या आहेत. नाकाशेजारी मोठा तीळ आहे. या वृद्धेने आपल्या अंगावर हिरवा ब्लाऊज, केसरी व काळ्या रंगाची फुलांची डिझाईन असलेली साडी. परिधान केली आहे. तिचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात ठेवण्यात आला आहे. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी 0831-2405273 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.