तिसऱ्या लाटेपूर्वी नव्या रिपोर्टमधून खळबळजनक दावा

belgavkar.com | belgaum | belgavkar

गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगात कोरोना व्हायरसनं हाहाकार माजवला आहे. लाखो लोकांचा जीव कोरोनामुळे गेला आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी अनेक देशात संशोधन सुरु आहे. सध्या लसीकरण हा एकमेव पर्याय कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी केला जात आहे. कोरोनाच्या नव्या रिसर्चसोबत संशोधक कोरोनाच्या बदलणाऱ्या व्हेरिएंटवरही शोध घेत आहेत. त्यात कोरोना व्हायरसच्या बदललेल्या व्हेरिएंटनं हवेतही कोरोना विषाणू दूरपर्यंत जात असल्याचं दिसून आलं आहे. नव्या स्टडी रिपोर्टमधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
लोकांच्या सुरक्षेसाठी टाइट फिटिंगवाले मास्क घालायला हवेत असा स्टडी रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. त्याचसोबत संक्रमण रोखण्यासाठी सध्या लसीकरण करणं खूप गरजेचे आहे असा दावाही कोरोनाच्या नव्या स्टडी रिपोर्टमधून करण्यात आला आहे. अमेरिकेच्या मॅरीलँड विश्वविद्यालयाच्या संशोधकांच्या टीमने हा रिपोर्ट बनवला आहे. यात कोरोना संक्रमित लोक श्वसनाच्या माध्यमातून संक्रमण पसरवू शकतात. कारण अल्फा व्हेरिएंट अन्य व्हेरिएंटच्या तुलनेने 43 ते 100 पटीनं हवेत अधिक पसरतो. रिसर्च जर्नल क्लीनिकल इन्फेक्शन डीजीजमध्ये प्रकाशित झालेल्या स्टडीत कपड्यांपासून बनलेला मास्क आणि सर्जिकल मास्क हवेत व्हायरस पसरण्यापासून आणि लोकांना संक्रमित करण्यापासून बचाव करू शकतो असंही सांगण्यात आलं आहे.
मेरीलँड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे प्रोफेसर डॉन मिल्टन म्हणाले की, आमच्या नव्या स्टडीत हवेच्या माध्यमातून कोरोना पसरत असल्याचं सिद्ध केलंय. अल्फा व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंट अधिक संक्रमित आहे. कोरोनाचे वेगवेगळे व्हेरिएंट हवेच्या माध्यमातून लांबपर्यंत जात असल्याचं स्टडीत म्हटलं आहे. त्यामुळेच कोरोना संक्रमण रोखण्यासाठी टाइट फिटिंगवाले मास्क परिधान करणं आवश्यक आहे. त्याचसोबत लसीकरण करणंही गरजेचे आहे. आतापर्यंत जगभरात 22 कोटी 93 लाखाहून अधिक लोक कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकले आहेत. या जीवघेण्या व्हायरसनं जगात 47 लाखाहून जास्त लोकांचा जीव घेतला आहे. या व्हायरसचा सर्वाधिक फटका जगातील 5 प्रमुख देशांना झाला त्यात अमेरिका, भारत, ब्राझील, ब्रिटन आणि रशिया यांचा समावेश आहे.
belgavkar.com
belgavkar
belgaum

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

तिसऱ्या लाटेपूर्वी नव्या रिपोर्टमधून खळबळजनक दावा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm