रायपूर रेल्वे स्टेशनवर स्फोट; CRPF चे 6 जवान गंभीर जखमी

रायपूर रेल्वे स्टेशनवर स्फोट;
CRPF चे 6 जवान गंभीर जखमी

belgavkar.com | belgaum | belgavkar

रायपूर : छत्तीसगडची राजधानी रायपूर रेल्वे स्टेशनवर एका ट्रेनमध्ये अचानक स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. तसेच, या स्फोटात सीआरपीएफचे (CRPF) 6 जवान गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सीआरपीएफच्या 211 व्या बटालियनचे जवान विशेष ट्रेनने जम्मूला जात होते. यावेळी रायपूर रेल्वे स्टेशनवर ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर थांबली असता शिफ्टिंग दरम्यान डेटोनेटर बॉक्समध्ये स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सीआरपीएफने दिलेल्या माहितीनुसार, डेटोनेटर बॉक्स फुटल्याने हा स्फोट झाला. स्फोटानंतर स्टेशन परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आल्यानंतर ट्रेन सकाळी 7.15 मिनिटांनी पुढे रवाना करण्यात आली. या स्फोटात कोणत्याही सामान्य नागरिकाला नुकसान झालेले नाही.
Chhattisgarh | Four CRPF personnel injured in an explosion caused after a box containing igniter set fell on the floor in a CRPF Special Train at Raipur railway station, says Raipur Police
— ANI (@ANI) October 16, 2021
जखमी झालेल्या जवानांपैंकी हवालदार विकास चौहान यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर चवन विकास लक्ष्मण, रमेश लाल, रविंद्र कर, सुशील, दिनेश कुमार पॅकरा हे किरकोळ जखमी झाले आहेत. सीआरपीएफचे उच्च अधिकारी जवानांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत.
दरम्यान, यापूर्वी 17 जूनला सिकंदराबादहून दरभंगा जंक्शनवर पोहोचलेल्या सिकंदराबाद दरभंगा एक्सप्रेसच्या पार्सल व्हॅनमधून उतरवलेल्या रेडीमेड कापडाच्या पॅकेटमध्ये स्फोट झाला होता. एक्सप्रेस 1:18 वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर थांबली. त्यानंतर पार्सल व्हॅनमधून मालाचे पॅकेट उतरवले जाऊ लागले. पहाटे 3:25 वाजता रेडीमेड कपड्यांचे एक पॅकेट फुटले. या दरभंगा रेल्वे स्टेशनवरील पार्सल स्फोटाचे 'पाकिस्तान कनेक्शन' देखील समोर आले होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

रायपूर रेल्वे स्टेशनवर स्फोट; CRPF चे 6 जवान गंभीर जखमी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm