बेळगाव : धनगर वाड्यावर 'ऑपरेशन मदत'तर्फे शैक्षणिक साहित्याची मदत

बेळगाव : धनगर वाड्यावर 'ऑपरेशन मदत'तर्फे शैक्षणिक साहित्याची मदत

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : 'ऑपरेशन मदत'चे कार्यकर्ते दुर्गम भागातील खेडोपाडी व धनगरवाड्यावर जाऊन शैक्षणिक साहित्याची मदत देऊन तेथील मागासलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ग्रामीण शिक्षण अभियानांतर्गत प्रयत्न करत आहेत. त्यानुसार चंदगड तालुक्यातील घनदाट जंगलात असणाऱ्या जंगमहट्टी धनगर वाड्यावरील सरकारी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला व त्यांच्यात शिक्षणाची ओढ लागावी म्हणून त्यासर्वांना वह्या, पेन, पेन्सिली, खोडरबर, शार्पनर असे साहित्य दिले.
स्थानिक शाळेसाठी 1 ग्रीन बोर्ड, 1 डस्टर व 1 जंबो चाॅकबाॅक्स शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष लक्ष्मण शेळके व शिक्षक कांबळे सरांकडे सुपुर्द करण्यात आले. याप्रसंगी आनंद कांबळे सरांनी प्रास्ताविक केले. कॅंटोन्मेंट बोर्ड प्रायमरी स्कूलचे मुख्याध्यापक प्रशांत बिर्जें सरांनी ‘ऑपरेशन मदत’ तर्फे ग्रामीण शिक्षण अभियान कसे राबविण्यात येते याबद्दल थोडक्यात माहिती उपस्थितांना दिली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला डाॅ. केतकी पावसकर, डाॅ. शंतनु पावसकर, दिपक ओऊळकर, भालचंद्र पाटील, गजानन साबन्नवर, चेतन शहा व महेश जाधव यांनी मदत केली. यावेळी प्रसाद हुली, जगदीश गस्ती, गौतम श्रौफ व संजय साबळे यां मान्यवरांनी मोलाची मदत केली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : धनगर वाड्यावर 'ऑपरेशन मदत'तर्फे शैक्षणिक साहित्याची मदत

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm