बेळगाव : बसवाण गल्ली येथे बेशुद्धावस्थेत एक व्यक्ती कोसळली होती. याची माहिती फेसबुक फ्रेड्स सर्कलच्या सदस्यांना देण्यात आली. त्यानंतर तातडीने अवधूत तुडवेकर व संतोष दरेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने त्याला बिम्स् हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याबाबत पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी यांनाही याची माहिती देण्यात आली. त्यानंतर खडेबाजार पोलीस स्थानकाचे पीएसआय आर. बी. सौदागर व कॉन्स्टेबल मेहबूब पटेल हे देखील दाखल झाले. त्यांच्या मदतीने संबंधित व्यक्तीला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आल्याने त्याचे प्राण वाचले आहेत.