बेळगाव शहरातील 64 बसेसमध्ये जीपीएस, मिळणार Live Location

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरातील 64 बसेसमध्ये जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली आहे. बेळगाव ॲपव्दारे लोकांना बस नेमकी कुठे आहे (Live Location), याची माहिती मिळू लागली आहे, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक प्रवीण बागेवाडी यांनी दिली आहे. स्मार्ट सिटी योजनेने बेळगाव ॲप विकसीत केले असून लोकांना डाऊनलोड करता येते. या ॲपच्या माध्यमातून ज्या 64 बसेसमध्ये जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली आहे, त्या नेमक्या कुठे आहेत, याची माहिती मिळत आहे.
स्मार्ट सिटीने शहरातील 10 बस थांबे स्मार्ट केले असून त्याठिकाणी डिजीटल सेवा देण्यात येत आहे, अशीही माहिती बागेवाडी यांनी दिली आहे. अधिकाधीक लोकांनी ॲपचा वापर करावा, यासाठी जागृती करण्यात येत आहे. ॲपच्या माध्यमातून आम्हाला प्रतिसाद कसा लाभत आहे, याची माहिती मिळण्यास मदत होईल, असे व्यवस्थापक सलमान सिंदगीकर यांनी सांगितले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव शहरातील 64 बसेसमध्ये जीपीएस, मिळणार Live Location

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm