• Facebook
  • Youtube
  • Instagram
  • Twitter
  • Google+
news_289
news_289

बेळगावचे तीन काॅलेज विद्यार्थी देसुरजवळ अपघातात ठार

सुटीचा दिवस असल्याने फोटोशुटसाठी गेलेल्या कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला.
ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या कारची आणि दुचाकीची आमोरा समोर झालेल्या धडकेत तीन युवक ठार झाल्याची घटना बेळगाव खानापूर रोड येथील देसुर क्रॉस जवळ (प्रभु नगर) घडली आहे.

देसुरजवळ अपघातात मृत झालेले युवक

अमन आनंद कपिलेश्वरी (वय 17, रा. अनसुरकर गल्ली), हर्ष सुनील सांगावकर (वय 17, रा. मुजावर गल्ली), अथर्व अमोल जाधव (वय 16, रा. कोनवाळ गल्ली) अशी त्या दुर्दैवी विद्यार्थ्यांची नावे आहेत. यंदाच सर्व विद्यार्थी दहावी परीक्षा उत्तीर्ण झाले होते व काॅलेजला प्रवेश घेतला होता.


घटनास्थळी ग्रामीण पोलीस स्थानकाचे निरीक्षक नारायण स्वामी दाखल झाले असून मयत झालेल्या युवकांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
सकाळी पावणे बाराच्या सुमारास हा अपघात घडला असून तिन्ही युवक घटनास्थळीच ठार झाले आहेत. डोक्याला व गुप्तांगाला जबर मार बसून त्या तिघाजणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर तरुणांचे मृतदेह २० ते 30 फूट अंतरावर पडले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
मयत युवक जैन कॉलेज व जीएसएस काॅलेजचे विद्यार्थी होते. देसुर क्रॉस जवळ दुसऱ्या गाडीला ओव्हर टेक करतेवेळी
इंडिका कार ची धडक बसल्याने हा अपघात झाला.
ग्रामीण पोलिसांत हा गुन्हा नोंद झाला आहे.
आजच्या युवापिढीमध्ये असलेली फोटोशुटची क्रेझ जीवावर बेतली...

ऍक्टीव्हावरून हे तिघेजण भूतनाथ मंदिराला फोटोशूट करण्यासाठी गेले होते. तेथून बेळगावला परतताना हा भीषण अपघात घडला.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास बेळगाव येथील सात मित्र फोटोशूटसाठी तीन दुचाकीवरून भूतनाथ मंदिराला गेले होते. भूतनाथ मंदिर हे एका उंच डोंगरावर असून तेथे मोठं मोठे दगड तसेच चाप्या आडोश्याश्या जागा आहे. त्यामुळे हि जागा युवकांसाठी फोटोशूटसाठी तर प्रेमीयुगलांसाठी फेमस जागा आहे. 11 वाजण्याच्या सुमारास घरी परतताना एका तरुणाची दुचाकी सुरू झाली नाही, त्यामुळे चार युवक तेथेच थांबले. अमन, हर्ष व अथर्व हे ऍक्टीव्हावरुन बेळगावला येण्यासाठी निघाले. प्रभूनगरजवळ येताच इंडिका कारची दुचाकीला धडक बसली व हा अपघात झाला.

प्रभु नगर जवळील उतारीला दुचाकी आली असता त्यांच्या समोरून दुसरे वाहन चालले होते. त्याला ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना बेळगावहुन खानापूर कडे निघालेल्या इंडिका मोटारीची दुचाकीला जोरदार धडक बसली. यामध्ये दुचाकी वरील तिघेजण रस्त्यावर उडून पडल्याने त्यांच्या डोकीला गंभीर इजा झाली. यामध्ये ते जागीच ठार झाले. मोटारीमधील सर्वजण खानापूर कडे मुलगी पाहायला जात असल्याची माहिती मिळाली आहे.


संपुर्ण बेळगांव ला दुःखाच्या सागरात लोटणारी हि घटना व अशा अनेक घटना घडत आहेत, याला जबाबदार कोण...???
नुकतीच वयात आलेली हि पोर आज या दुनियेतुन निघून गेली.
बेळगांव जरी दिवसेंदिवस प्रगती करत असलं तरी अशा घटनांनी मन सुन्न होत! पालक, विद्यार्थी, समाज या सर्वांनीच वेळीच भान ठेवून आपली जबादारी ओळखायला हवी. काल परवाच बेळगावात रस्ते सुरक्षा रॅली काढण्यात आली हजारो विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला होता, अशा विविध गोष्टीतून जागृती केली जाते पण दुःख या गोष्टीच वाटतंय कि आपण एक बातमी म्हणून ती वाचतो जागृत होतच नाही.
बेळगावच्या उत्तरोउत्तर प्रगतीत अशा घटनांना स्थान न मिळो अशी अपेक्षा ठेवूया व यापुढे तरी जागृती करून जागृत होऊया...! मृत विद्यार्थ्यांना भावपुर्ण श्रद्धांजली! व मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही बेळगांवकर सामील होऊया!
Join Whatsapp Group www.belgavkar.com
Advertisement Contact us...
Like our Facebook Page www.belgavkar.com
Subscribe to our Youtube Channel www.belgavkar.com