ग्रामपंचायत सदस्याने तरुणीवर अत्याचार केल्याचा गुन्हा

ग्रामपंचायत सदस्याने तरुणीवर अत्याचार केल्याचा गुन्हा

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. खानापूर : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी खानापूर पोलिसांत ग्रामपंचायतीच्या सदस्याविरुद्ध अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, देवलत्ती ग्रामपंचायत सदस्य सोमनिंग अडव्याप्पा चवलगी (वय 30, रा. कामसिनकोप्प) याने पीडित तरुणीच्या घरच्यांना पंचायतीकडून विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याची आशा दाखवली. यातच पीडित तरुणीला त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर गेल्या तीन वर्षांपासून त्याचार करीत होता. तरुणीने लग्नाचा तगादा लावल्यानंतर त्याने लग्नास नकार दिला.
ग्रामपंचायत सदस्य असल्याचा गैरवापर करून त्याने ग्रामस्थांनाही पीडितेच्या कुटुंबाविरोधात फितवले. त्यामुळे, पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिस निरीक्षक सुरेश शिंगी यांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केला.
उपनिरीक्षक बसगौडा पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्रामपंचायत सदस्य ला तत्काळ अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली. ग्रामपंचायत सदस्यावर पीडितेवर अत्याचार करण्यासह कुटुंबीयांना धमकावल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. खानापूर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

ग्रामपंचायत सदस्याने तरुणीवर अत्याचार केल्याचा गुन्हा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm