भारतात या दिवशी मान्सून दाखल होण्याची शक्यता, आयएमडीचा अंदाज

भारतात या दिवशी मान्सून दाखल होण्याची शक्यता, आयएमडीचा अंदाज

belgavkar.com | belgaum | belgavkar

कोरोनामुळे तळाला गेलेल्या अर्थव्यवस्थेसाठी यंदाचा पाऊस गरजेचं

भारतामध्ये 1 जूनला मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. केरळमधून मान्सून भारतात दाखल होईल, असंही भारतीय हवामान खातं (INDIA METEOROLOGICAL DEPARTMENT IMD आयएमडी) ने सांगितलं. कोरोनाच्या संकटात यंदाचा मान्सून अर्थव्यवस्थेला पुन्हा पटरीवर आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. 1 जूनला केरळमध्ये मान्सून दाखल व्हायला वातावरण पोषक, असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
याआधी आयएमडीने केरळमध्ये 5 जूनला मान्सून दाखल होईल, असं सांगितलं होतं. भारतातली बहुतेक शेती ही जून ते सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या पावसावर अवलंबून असते. कोरोनामुळे तळाला गेलेल्या अर्थव्यवस्थेसाठी यंदाचा पाऊस चांगला होणं आणि शेतीतून उत्पन्न जास्त येणं गरजेचं आहे. भारताची अर्थव्यवस्था ही आशिया खंडातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहे.
उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारा अशा स्थितीत सापडलेल्या कर्नाटकाची लवकरच सुटका होणार आहे. येत्या 8 जून पर्यंत मान्सून महाराष्र्ट व कर्नाटकात दाखल होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागचे विरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपि यांनी माहिती देताना सांगितले की, सध्याच्या हवामानाची स्थिती पाहता येत्या 8 जून पर्यंत मान्सून कोकणमार्गे मान्सून दाखल होईल. त्यानंतर पुढे 8 ते 14 जून या कालावधीत विविध ठिकाणी पावसालाही सुरुवात होईल, असे कश्यपी म्हणाले.
यंदाच्या वर्षीचा मान्सून हा सरासरी असेल. यावेळच्या मान्सूनचं प्रमाण 100 टक्के असेल, तसंच यामध्ये 5 टक्के मागे किंवा पुढे होण्याची शक्यताही आहे, हे आयएमडीने याआधीच सांगितलं होतं. त्यामुळे शेतीचं उत्पन्न जास्त होईल, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

भारतात या दिवशी मान्सून दाखल होण्याची शक्यता, आयएमडीचा अंदाज
कोरोनामुळे तळाला गेलेल्या अर्थव्यवस्थेसाठी यंदाचा पाऊस गरजेचं

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm