बेळगाव : बेळगाव रेल्वे स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आले असून येथील ऊर्वरित कामे पूर्ण केली जात आहेत. रेल्वे स्टेशनवर अनेक वर्षांच्या मागणीनंतर सरकता जिना बसविला जात आहे. या जिन्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. यामुळे प्रवाशांना याचा लाभ होणार आहे. रेल्वे स्टेशन प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्यानंतर हा जिना सुरु केला जाणार आहे. यामुळे महिला व वृद्ध प्रवाशांना लाभ होणार आहे.
बेळगाव रेल्वे स्टेशनवरून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये-जा असते. स्टेशनचे काम सुमारे साडेतीन वर्षांपासून सुरु करण्यात आले होते. या ठिकाणी सरकता जिना बसवावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. मात्र, आता ही मागणी पूर्णत्वाला येत आहे. रेल्वे स्टेशनच्या इमारतीचे उद्घाटन येत्या दोन महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यानंतर हा जीना देखील प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.