बेळगाव : बाराव्या शतकातील संत नुलीचंदय्या यांच्या जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मिरवणुकीत मोठ्या आवाजात साउंड सिस्टिमचा वापर करण्यात आला. त्यामुळे मार्केट पोलिसांनी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून घेतला असून तीन वाहने जप्त केली आहेत. जयंतीनिमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीतील तीन वाहनांवर साउंड सिस्टिम लावण्यात आली होती. त्यामुळे सरकारतर्फे पोलिसांनी स्वतः फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी तीन वाहने व वीस साउंड सिस्टिमचे बॉक्स पोलिसांनी जप्त केले आहेत. याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनानंतरच्या काळात यंदाचा गणेशोत्सव होत आहे. त्यामुळे सरकारने गेली दोन वर्षे उत्सवावर घातलेले निर्बंध उठवले आहेत. साउंड सिस्टिमला यापूर्वी परवानगी नाकारण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशावरून आवाज किती असावा, याचे नियम ठरले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळातही हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.